कर्जमुक्तीसाठी जिल्ह्याला लागणार  एक हजार २७८ कोटींवर...

file photo
file photo

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील दोन लाख २३ हजार ६४७ शेतकरी पात्र ठरले असून आतापर्यंत दोन लाख ११ हजार ५६६ शेतकऱ्यांनी आधार लिंक केले आहे, तर उर्वरित १२ हजार ८१ शेतकऱ्यांची आधार लिंक करणे शिल्लक असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिली. कर्जमुक्ती करण्यासाठी जिल्ह्याला एक हजार २७८ कोटी ६२ लाख ६३ हजार ६०१ रुपये लागणार आहेत. कर्जमाफीच्या याद्या ता. २१ रोजी जाहीर होणार आहेत.

पीएम किसान कार्ड संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. १२) पत्रकार परिषद पार पडली. या वेळी ते बोलत होते. राज्य शासनाने नुकतीच कर्जमाफी जाहीर केलेली आहे. दोन लाखांपर्यंत कर्ज घेतले अशा शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नसून थकबाकीदेखील भरण्याची अट नाही. जिल्हा प्रशासनाने मागविलेल्या माहितीमध्ये दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत पात्र ठरविले आहे. जे शेतकरी पात्र आहेत, अशांच्या नावाची यादी संबंधित बॅंकेत लावली आहे. कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार आहे. राष्ट्रीयीकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी, ग्रामीण बॅंका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले अल्पमुदत पीककर्ज माफ होणार आहे.

पीक पुनर्गठित कर्ज माफ होणार
ता.३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले व ता. एक एप्रिल २०१५ तते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीककर्ज आणि पीक पुनर्गठित कर्ज माफ होणार आहे. ज्यांचे कर्ज माफ झाले अशा शेतकऱ्यांच्या याद्या ता. १५ ते २१ दरम्यान लागणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिली आहे. या वेळी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, कृषी अधीक्षक संतोष आळसे, वरिष्ठ लिपिक विजय देखणे आदी उपस्थित होते.

दोन लाखांवर शेतकऱ्यांनी केले आधार लिंक
जिल्ह्यातील दोन लाख २३ हजार ६४७ शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरले आहेत. त्यातील दोन लाख ११ हजार ५६६ शेतकऱ्यांनी खातेक्रमांक आधारशी लिंक केला आहे, तर १२ हजार ८१ शेतकऱ्यांचे खाते आधारशी लिंक करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी एक हजार २७८ कोटी ६२ लाख ६३ हजार ६०१ रुपये लागणार आहेत.
 

एक लाख ८५ हजार शेतकऱ्यांचा डाटा अपलोड
आधार लिंक केलेल्या एक लाख ८५ हजार ६२७ शेतकऱ्यांचा डाटा अपलोड केला आहे. उर्वरित २५ हजार ९३६ शेतकऱ्यांचा लवकरच डाटा अपलोड होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिली.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com