बारावीच्या उत्तरपत्रिकांचे आता जिल्हानिहाय संकलन 

सुहास सदाव्रते 
Thursday, 21 May 2020

जालना -  औरंगाबाद शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता बारावीच्या उत्तरपत्रिका जिल्हानिहाय संकलन केंद्रावर जमा करण्यात येणार आहे. येत्या ता.२६ ला जालना जिल्ह्यातील नियामकांनी उत्तरपत्रिका जमा कराव्यात,असे विभागीय मंडळाने कळविले आहे. 

जालना -  औरंगाबाद शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता बारावीच्या उत्तरपत्रिका जिल्हानिहाय संकलन केंद्रावर जमा करण्यात येणार आहे. येत्या ता.२६ ला जालना जिल्ह्यातील नियामकांनी उत्तरपत्रिका जमा कराव्यात,असे औरंगाबाद विभागीय मंडळाने कळविले आहे. 

औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच औरंगाबाद विभागीय मंडळाने विभागातील बारावीच्या नियामकांनी उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु औरंगाबाद शहरासह जिल्हयात कोरोना विषाणू लागण झालेल्या रुग्णाची संख्या अधिक आहे. त्यामुळे नियामकांनी अशा परिस्थितीत औरंगाबाद येथे उत्तरपत्रिका कशा जमा कराव्यात असा संतप्त सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला होता. 

हेही वाचा : बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

शिक्षक संघटनेचा रोष विचारात घेता औरंगाबाद विभागीय मंडळाने आता प्रत्येक जिल्हयात संकलन केंद्र दिले आहेत. गुरुवारी ( ता.२१ ) औरंगाबाद विभागीय मंडळाने याबाबत नव्याने आदेश काढले आहे.

हेही वाचा : पारंपरिक पदार्थांसह खवय्या मुलांची पोटपूजा जोरात

औरंगाबाद विभागातील औरंगाबादसह जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील संकलन केंद्रावर उत्तरपत्रिका जमा करण्याचे वेळापत्रक सुधारित करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील बारावीच्या नियामकांनी मंगळवारी ( ता.२६ ) जिल्हा संकलन केंद्र राष्ट्रीय हिंदी विद्यालय येथे उत्तर पत्रिका जमा कराव्यात. जिल्हा संकलन केंद्रावर औरंगाबाद विभागीय मंडळाचे सहसचिव आर.पी.पाटील यांच्यासह आठ अधिकारी व शिपाई वर्गही विशेष नियोजन करण्यात आले आहे.

विभागातील जिल्ह्यात ता.२२ पासून ते ता.३ जूनपर्यंत उत्तरपत्रिका संकलन नियोजन करण्यात आले आहे. औरंगाबादच्या विभागीय मंडळ कार्यालयात औरंगाबाद व गंगापूर तालुक्यातील उत्तरपत्रिका ता.२२ व ता.२३ मे, उर्वरित तालुक्यातील ता.२४ मेला संकलित होतील. जालन्याच्या राष्ट्रीय हिंदी विद्यालयात ता.२६ मे रोजी , हिंगोलीच्या माणिक मेमोरियल विद्यालयात ता. २७ मे रोजी संकलित केल्या जातील. परभणीच्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेत परभणी शहर व तालुक्याचे ता.२९ मे रोजी तर उर्वरित तालुक्यांतील उत्तरपत्रिका ता.३१ मे रोजी संकलित होतील. बीडच्या घुमरे पाटील हायस्कूलमध्ये बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव तालुक्यासाठी ता.२ जून तर उर्वरित तालुक्यांतील उत्तरपत्रिका ता.३ जून रोजी संकलित होतील.

मंडळाने उत्तरपत्रिका जिल्हा निहाय संकलन केंद्रावर जमा करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. खरेतर यापूर्वी हा निर्णय होणे अपेक्षित होते. शिक्षक संघटनेच्या प्रयत्नास यश आले आहे. 
- प्रा.सुग्रीव वासरे 
जिल्हाध्यक्ष ,जुक्टा संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District wise compilation of answer sheets