Diwali Festival 2020 : लातुरात फक्त दोनच तास फटाके फोडण्यास परवानगी

विकास गाढवे
Saturday, 14 November 2020

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या शहरांची यादी जाहीर केली असून, त्यात लातूरचा समावेश आहे.

लातूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या शहरांची यादी जाहीर केली असून, त्यात लातूरचा समावेश आहे. यामुळे शहरात लवादाने केवळ ग्रीन फटाके विक्रीला व रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार आदेश दिले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होणार आहे.

Diwali 2020 : दिवाळीचा जिवंत 'वसु बारस' देखावा, छायाचित्रकाराने दिला मराठमोळा लुक

राष्ट्रीय हरित लवादाने नऊ नोव्हेंबर रोजी देशभरातील प्रदूषणाच्या पातळीनुसार शहरांची यादी जाहीर केली आहे. यादीत लातूरचा समावेश असून शहराचा समावेश वायूची कमी गुणवत्ता असलेल्या शहरांत केली आहे. वायू गुणवत्तेनुसार शहर हे समाधानकारक मध्यमपेक्षा चांगल्या स्तर या प्रकारात मोडत असली तरी या प्रकारातील शहरात केवळ ग्रीन फटाके विक्रीला लवादाने परवानगी दिली आहे. यासोबत रात्री आठ ते दहा या दोन तासातच फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच नागरिकांना दिवाळीचा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

आंबट चिंचेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा, यंदा उत्पादन वाढणार

त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही काढल्या आहेत. आता हरित लवादाने दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी श्रीकांत यांनी आदेश काढत शहरात केवळ ग्रीन फटाके विक्री करण्याचे तसेच हे फटाके रात्रीचे दोनच तास फटाके फोडण्याचे बंधन घातले आहे. लवादाचे आदेश फटाका विक्रेते व नागरिकांना बंधनकारक करण्यात आले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात साथरोग प्रतिबंधक कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले आहेत.

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Festival 2020 Two Hours For Firecrackers Bursting In Latur