Diwali Festival : आता लागले परतीचे वेध ! दिवाळीच्या निमित्ताने एसटी फुल्ल, बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी

दिवाळीच्या निमित्ताने राज्य परिवहन मंडळाने देखील जादा फेऱ्यांचे नियोजन केले असून, बस स्थानकावर महामंडळाच्या बसेससह प्रवाशांची गर्दी
diwali festival msrtc bus full bus stand is crowded with passengers sillod
diwali festival msrtc bus full bus stand is crowded with passengers sillodSakal

सिल्लोड: दिवाळी सणाच्या निमित्ताने बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी बघावयास मिळत असून, पाडवा व भाऊबीज साजरी करण्यासाठी गावाकडच्या ओढीने रस्त्यावर देखील वाहनांची मोठी रहदारी दोन दिवसांपासून वाढली आहे.

दिवाळीच्या निमित्ताने राज्य परिवहन मंडळाने देखील जादा फेऱ्यांचे नियोजन केले असून, बस स्थानकावर महामंडळाच्या बसेससह प्रवाशांची गर्दी झाली आहे. एसटीच्या प्रवासात महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

सकाळपासुन सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांची होत असलेली गर्दी बघता आगाराच्या वतीने लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या आहे. सर्वच एसटी बसेस फुल्ल प्रवासी घेऊन धावत आहे. त्यामुळे दिवाळीचा सन एसटीच्या उत्पन्नात वाढ देणारा ठरणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com