esakal | 'ताई तू घाबरू नको काही होत नाही'; घाबरलेल्या गर्भवती महिलेला डॉक्टरांनी दिला मायेचा आधार

बोलून बातमी शोधा

corona worriors
'ताई तू घाबरू नको काही होत नाही'; घाबरलेल्या गर्भवती महिलेला डॉक्टरांनी दिला मायेचा आधार
sakal_logo
By
भास्कर सोळंके

जातेगाव (बीड): ग्रामीण भागातील गावखेड्यात कोरोनाची साथ बळावत चालली आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह येताच बाधितांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. ग्रामीण भागात कोरोना बाधित झाल्यावर कोणी जवळ येत नसले तरी जातेगाव (ता गेवराई) येथील एका सात महिन्याची गर्भवती महिलेची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने सदर महिलेनी हंबरडा फोडताच 'ताई तु घाबरु नको काही होत नाही', असा मायेचा हात फिरवत डाॅ. जीवन राठोड यांनी धीर दिला.

जातेगाव (ता गेवराई) प्राथमिक आरोग्य अंतर्गत येत असलेल्या गाव खेड्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना चाचणी पॉझिटीव्ह येताच सदर व्यक्तीच्या बाबतीत बघण्याचा दृष्टीकोन बदलतो त्यांच्या जवळ कोणी जात नसल्याने अशा रुग्णाच्या मनात भय निर्माण होत आहे. मात्र जातेगाव येथील खासगी डाॅक्टर जीवन राठोड यास अपवाद ठरले आहेत.

हेही वाचा: RT-PCR टेस्टसाठी जास्त पैसे घेणे पडले महागात; लातुरात दोन लॅबवर कारवाई

गुरुवारी एका सात महिन्याची गर्भवती असलेल्या महिला कोरोना पॉझिटीव्ह आली. तिच्या मनात भीती निर्माण होऊन तीने हंबरडा फोडताच तीच्या मनातील भीती दूर करण्यात डाॅ. राठोड यांनी मायेचा हात फिरवत ताई घाबरु नकोस काही होणार नाही, अशी समजूत काढत सदर महिलेला पुढील उपचार करण्यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. सध्या सदर महिला उपचार घेत आहे.

हेही वाचा: लातुरात पुन्हा ‘रेमडेसिव्हिर’चा काळाबाजार, पाच जणांना अटक

कोरोना पॉझिटीव्ह येताच नागरीकांच्या मनात भीती निर्माण होते. जवळचे नातेवाईक देखील दूर होत असल्याने त्यांच्या मनात भीती निर्माण होते. परिणामी अस्वस्थता वाढत जाते. अशा वेळी त्यांना धीर देण्याची गरज असून तेच मी केले, असे डाॅ जीवन राठोड यांनी सांगितले