अरे बाप रे ! घरासमोर ३० किलो, १२ फुटी अजगर येवून बसला, पुढे झाले असे की..

प्रा. प्रविण फुटके 
Tuesday, 11 August 2020

साप म्हटले की, माणूस घाबरून पळायला लागतो. सायंकाळी घराच्या समोर भला मोठा साप निघाल्यावर घरातील सगळेच घाबरून गेले. हा साप तब्बल १२ फूट अंदाजे २८ ते ३० किलो वजनाचा होता. अखेर सर्पमित्र गायकांबळे यांनी मोठ्या शिताफीने तो पकडला अऩ् सगळ्यांच्या जीवात जीव आला. 

परळी वैजनाथ (बीड) : तालुक्यातील कन्हेरवाडी येथे रविवारी (ता.०९) सायंकाळी घराच्या शेजारी भलेमोठे अजगर पकडण्यात आले. अजगर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

आपल्याकडे कुठेतरी एखादवेळी साप पाहण्यास मिळतो. सापाचे नाव जरी काढले तरी नागरिक घाबरून जातात. यात अजगर म्हटल्यावर तर न विचारलेले बरे. याचे झाले असे की, रविवारी (ता.०९)  सायंकाळी कन्हेरवाडी येथील श्री. मुंडे यांच्या आखाड्यावर साडेदहाच्या सुमारास अचानक अजगर दिसून आले.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

अजगर दिसताच आखड्यावर असलेल्या नागरिक हैराण झाले. तत्काळ शहरातील शारदा नगर येथील सर्पमित्र नितीन श्रवण गायकांबळे यांना बोलावून घेतले.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

नितीननेही लगेच कन्हेरवाडी येथे तत्परतेने धाव घेऊन भलेमोठे अजगर पकडले. या अजगराची लांबी जवळपास १२ फूट असून वजन अंदाजे २८ किलो आहे. त्यानंतर हे अजगर येथील वनविभागाच्या स्वाधीन केला. हे अजगर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांना मोठी गर्दी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dragon came house and finally catch him 

Tags
टॉपिकस