लोदग्यात शेतीसाठीचे ड्रोनचे प्रात्याक्षिक होणार

हरी तुगावकर
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

लातूर : बंगळुरु येथील भारतीय विज्ञान संस्थेने शेतीसाठी विकसित केलेल्या ड्रोन अॅग्रीकल्चरचे प्रात्याक्षिक व कार्यशाळा 24 व 25 सप्टेंबरला लोदगा (ता. औसा) येथे आयोजित करण्यात आली आहे. शेतीसाठी उपयुक्त ठरणारे या तंत्रज्ञानाचे राज्यात पहिल्यांदाच येथे प्रात्याक्षिक सादर होणार आहे, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी येथे बुधवारी (ता. 19) पत्रकार परिषदेत दिली.

लातूर : बंगळुरु येथील भारतीय विज्ञान संस्थेने शेतीसाठी विकसित केलेल्या ड्रोन अॅग्रीकल्चरचे प्रात्याक्षिक व कार्यशाळा 24 व 25 सप्टेंबरला लोदगा (ता. औसा) येथे आयोजित करण्यात आली आहे. शेतीसाठी उपयुक्त ठरणारे या तंत्रज्ञानाचे राज्यात पहिल्यांदाच येथे प्रात्याक्षिक सादर होणार आहे, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी येथे बुधवारी (ता. 19) पत्रकार परिषदेत दिली.

लोदगा येथील सर छोटूराम कॉलेज आॅफ अॅग्रीकल्चर अॅण्ड टेक्ऩॉलॉजी,
लोकनेते गोपीनाथ मुंडे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व शासनाच्या वतीने या
करीता पुढाकार घेण्यात आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे धोका वाढत चालला
आहे. पावसाची 27 नक्षत्र होती. त्यावरून पावसाचा काळही कळत होता. पण आता ढगफुटी आणि दुष्काळ  हे दोनच नक्षत्र राहिली आहेत. निसर्ग चुकला नाही तर आपण निसर्गच नष्ट करीत चाललो आहोत. दिवसेंदिवस शेतीतील संकटे वाढत चालली आहेत. संक्रमण अवस्था आहे. अशा परिस्थितीत शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे.

बंगळुरु येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी शेतीतील ड्रोन विकसित केले आहे. या ड्रोनच्या सहाय्याने दहा किलोमीटर परिसरातील सर्वे करता येणार आहे. या ड्रोनच्या सहाय्याने पिकाच्या वेगवान अचूक व परिणामकारक नोंदी शक्य होणार आहे. पीकनिहाय क्षेत्राच्या आकडेवारीची अचूकता येणार आहे, कीडरोग आदी समस्यावर तातडीने उपाय योजना करणे शक्य होणार आहे, हंगामातील पिकनिहाय पीक परिस्थितीचा अंदाज घेता येणार आहे, पूरस्थिती, गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ आदी समस्याग्रस्त परिस्थिती वेळी वेगाने अंदाज आल्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात गतिमानता येणार आहे, विविध सर्व्हे कामातील गैरप्रकारांना आळा घालता येणार आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली.

हे तंत्रज्ञान राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारही केला आहे. यातूनच हे प्रात्याक्षिक होत आहे. हे प्रात्याक्षिक दाखवून शेतकऱयांशी संवाद साधण्यासाठी भारतीय विज्ञान संस्थेचे डॉ. के. पी. जे. रेड्डी, डॉ. जी. गोपालन, डॉ. एस. एन. ओमकार, डॉ. सॅनियल गेरॉल्ड हे शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. तसेच कृषी आयुक्त एस. पी. सिंह, विकास रस्तोगी, हंगा रेड्डी यांच्यासह चार कृषी विद्यापीठाचे संशोधक उपस्थित राहणार आहेत.तरी या प्रात्याक्षिकाच्या वेळी शेतकरयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. पटेल यांनी यावेळी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drone demonstration for farmers in latur