esakal | डीवायएसपी सतीश देशमुखांनी घडविली माय लेकराची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Dysp Satish Deshmukh

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. वाहने बंद झाल्याने नांदेड येथे शिक्षणासाठी गेलेल्या ऋषीकेश लोहटे यास गावाकडे जाता येत नव्हते. त्याच्या मदतीला वसमतचे पोलिस उपाधीक्षक सतीश देशमुख धावून आले. त्यांनी मदत करत त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले. 

डीवायएसपी सतीश देशमुखांनी घडविली माय लेकराची भेट

sakal_logo
By
पंजाब नवघरे

वसमत (जि. हिंगोली) : तालुक्यातील खापरखेडा येथील ऋषीकेश भानुदास लोहटे हा विद्यार्थी नांदेड येथे शिक्षण घेतो.  कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. नांदेड येथील खानावळी बंद असल्याने त्याच्या जेवनाचा प्रश्न निर्माण झाला होता. गावाकडे जावे तर वाहने नाहीत. कोंडीत सापडलेल्या ऋषीकेश लोहटे याच्या मदतीला वसमत येथील पोलिस उपाधीक्षक सतिश देशमुख धावून आले. त्यांनी विद्यार्थ्याशी संपर्क साधून खापरखेडा येथील त्याच्या घरी पोचती केले. 

वसमत तालुक्यातील खापरखेडा येथील ह.भ.प गणपतबुवा महाराज खापरखेडा यांचा नातू ऋषीकेश भानुदास लोहटे हा नांदेडला बारावीच्या शिक्षणासाठी किरायाने खोली करून राहतो. कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच बाजारपेठ बंद ठेण्यात आली आहे. 

हेही वाचा - ‘मी हिंगोलीकर... स्वयंशिस्त पाळणार, घरातच थांबणार!’

लॉकडाउनमुळे बाजारपेठ ठप्प

शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी बंद आहेत. वाहनेही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे किरायाच्या खोलीत राहणाऱ्या ऋषीकेश लोहटे याच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. वाहने बंद असल्याने गावाकडे जाता येत नव्हते. त्यामुळे आई-वडीलांसह नातेवाईक चिंतेत होते. कुठलीच सोय नसल्याने तो कोंडीत सापडला. ही माहिती मालेगाव येथील संदीप डाकुलगे यांच्या मार्फत वसमत येथील पोलिस उपाधीक्षक सतीश देशमुख यांना समजली. 

सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

त्यांनी ऋषीकेश लोहटे याचा मोबाइल क्रमांक घेत संपर्क साधला. त्याच्याशी बोलून त्याला धीर दिला. स्वतःच्या घरी नांदेडला बोलावून घेतले. त्यानंतर त्याला स्वतःच्या गाडीमध्ये नांदेडहून वसमत येथे पोचविण्याची सोय केली. श्री. देशमुख यांच्यामुळे ऋषीकेश व त्याच्या घरी आई-वडीलांची भेट झाली. ऋषीकेश घरी आल्याचे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पोलिस अधिकाऱ्यांमुळे आई-वडीलांची भेट झाल्याने सर्वत्र पोलिस अधिकारी सतिश देशमुख यांचे कौतून केले जात आहे. 

येथे क्लिक करा हिंगोलीकरांना दिलासा; चौघांचे अहवाल निगेटिव्ह

जीव धोक्यात घालून काम

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रंदिवस पोलिस कर्मचारी, अधिकारी, आरोग्य, स्वच्छता विभागातील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. कर्तव्य पार पाडत आहेत. केवळ कर्तव्यच नाही तर आपल्यातील माणुसकीही जीवंत ठेवत गरजूंना मदत करत आहेत. अनेक ठिकाणी पोलिस अधिकारी, कर्मचारी गरजूंना अन्नदान करत आहेत. नागरिकांनीही लॉकडाउनच्या काळात स्वत:ची काळजी घेत कुटुंबीयांचीही काळजी घ्यावी, या काळात घरातच थांबावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.