हिंगोलीतील आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ई-उद्घाटन

राजेश दारव्हेकर
Monday, 26 October 2020

हिंगोली येथे नव्याने सुरु होत असलेल्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेचा  लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालय इमारत परिसरात उभारण्यात आलेल्या सर्व सुविधायुक्त कोविड- १९ विषाणू परीक्षण संशोधन व निदान (आरटी-पीसीआर) प्रयोगशाळेचे ई- उद्घाटन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी (ता. २६) करण्यात आले.

हिंगोली येथे नव्याने सुरु होत असलेल्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेचा  लोकार्पण सोहळा संपन्न झाला. दर दिवशी २०० ते ३०० रुग्णांची आरटीपीसीआर चाचण्या होण्यास मदत होणार आहे.  यावेळी खासदार राजीव सातव, आमदार संतोष बांगर, आमदार बिप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह  मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जि. प उपाध्यक्ष मनिष आखरे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, डॉ. शिवाजी पवार, डाँ. दीपक मोरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. संजीवन लखमावार, डॉ. जिरवणकर, डॉ. शिबा तालिब, डॉ. पुंडगे, डॉ. चव्हाण, अधिपरिचारिका जोशी, उद्धव कदम आदींची उपस्थिती होती.

हेही वाचाहिंगोली : जिल्ह्यात ३५ हजार नागरिक होम क्वाँरंटाईनमध्ये, १२ हजार घरांना लावले रेड शिक्के

प्रयोगशाळेची उभारणी २.२५ लाख खर्च  करण्यात आला

हिंगोलीत जिल्ह्यातील आरटी- पीसीआर ही कोरोनाची महत्वपूर्ण चाचणी करणारी प्रयोगशाळा असल्यामुळे आतापर्यंत सर्व नमुने नांदेडला पाठवावे लागत होते. मात्र आता हिंगोलीतच सदर चाचण्या होणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या प्रयोगशाळेची उभारणी २.२५  लाख खर्च  करण्यात आला आहे. या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली मशिनरी वेगवेगळया ठिकाणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रक्रियेसाठी सुसज्ज कक्ष व पुरेशा जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालय येथील प्रयोगशाळेत सर्व कामांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेच्या उभारणीनंतर व इतर आवश्यक व्यवस्थेबाबत खात्री पटल्यानंतर एम्सकडून कोरोना चाचणी तसेच इतर तपासण्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

येथे क्लिक कराहल्लाबोल मिरवणूक : सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल -

वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार

खा.राजीव सातव यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे हिंगोलीत आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरु करण्याची मागणी केली असता. त्यांनी ही मागणी मंजूर करण्या संदर्भात संबधितांना पत्राद्वारे कळविले. त्यानंतर प्रयोगशाळा उभारणीसाठी लागणारा निधी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा नियोजनमधून उपलब्ध करुन दिला. या कामाचा खा.सातव यांनी सतत पाठपुरावा केल्याने आज या प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणी करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E-Inauguration of RTPCR Laboratory at Hingoli by Guardian Minister Varsha Gaikwad hingoli news