थकीत फी परतावा न मिळाल्यास संस्थाचालकांची 'काळी दिवाळी' 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

इंग्रजी संस्थाचालक, कर्मचाऱ्यांना निर्णय 

जालना : राज्यातील विनाअनुदानित शाळांचे एक लाख संस्थाचालक व दहा लाख कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे शासनाने आरटीईच्या २५ टक्के प्रवेशाचा थकीत फीचा परतावा न दिल्यास इनडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या वतीने काळी दिवाळी पाळण्यात येणार आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शासनाने भारत सरकराच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीत २५ टक्के प्रवेशाच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी ८२०६ लाख रूपयांची तरतूद मंजूर केल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून एका पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. केंद्र शासनाने निधी राज्य शासनाला निधी वर्ग केला असतानाही शालेय शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणामुळे निधी वितरित झालेला नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मागील एक महिन्यापासून या फी परताव्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र, तो अद्याप मिळाला नाही. त्यामुळे इनडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोशिएशनच्या वतीने आरटीईच्या २५ टक्के प्रवेशाचा थकित फीचा परतावा न मिळाल्यास काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रसिद्धी पत्रकारावर प्रदेशाध्यक्ष राजेद्र दायमा, प्रदेश उपाध्यक्ष नाना साातपूते, प्रदेश सचिव भरत भांदरगे, जिल्हाध्यक्ष सदीप बाहेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

(Edited by pratap awachar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education institute director Black Diwali