Coronavirus : निलंगा शहरात दोन मे पर्यंत नो एन्ट्री, घराबाहेर पडण्याचीही सक्त मनाई

Osmanabad News
Osmanabad News

निलंगा (लातूर) : निलंगा शहरातील एका धार्मिक स्थळी वास्तव्यास आलेल्या १२ परप्रांतीययांपैकी आठ जणांना कोरोनाची लागण झालेली असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शहरात आता दोन मेपर्यंत नो एन्ट्री करण्यात आली आहे. 

निलंगा शहराबाहेर जाणाऱ्या व शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी शहराच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत, असा आदेश उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी शनिवारी (ता. चार) काढले आहेत.

हरियाणातून वेगवेगळ्या मार्गावरून मार्गक्रमण करीत आलेल्या आंध्र प्रदेशातील १२ प्रवाशांनी शहरातल्या एका धार्मिक स्थळाचा आसरा घेतला होता. ही बाब परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. प्रशासनाने या बारा जणांना ताब्यात घेऊन विचारपूस, वैद्यकीय तपासणी केली असता, ८ जणांना कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले. 

त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. पण खबरदारी म्हणून निलंगा नगरपालिकेकडून तीन दिवस शहरातील संपूर्ण मार्केट व अत्यावश्यक सुविधा बंद करण्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सुविधा घरपोच पुरविण्याची सोय नगरपालिकेकडून करण्यात आल्याचे नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी सांगितले. 

उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी शहराच्या सर्व सीमा दोन मेपर्यंत बंद करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असून, शहरातही फिरण्यास व घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com