Corona Breaking, हिंगोलीत नव्याने आठ रुग्ण वाढले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

आठ व्यक्‍ती सोमवार रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोना बाधीत झाले असून सध्या कोरोनाचे 25 रुग्ण झाले.

हिंगोली : कळमनुरी येथील क्‍वारंटाईन सेंटर अंतर्गत सात व्यक्‍ती व वसमत तालुक्‍यातील चंदगव्हाण येथील 38 वर्षीय पुरुष असे एकूण आठ व्यक्‍ती सोमवार रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोना बाधीत झाले असून सध्या कोरोनाचे 25 रुग्ण झाले. अशी माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास मंगळवार (ता. २३) दिली. 

वसमत येथील क्‍वारंटाईन सेंटर अंतर्गत चंदगव्हाण गावातील  एका 38 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण 
झाली आहे. सदरील व्यक्‍ती औरंगाबाद शहरातून गावात परतला आहे. कळमनुरी क्‍वारंटाईन सेंटर अंतर्गत सात व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाली आहे. यातील पाच व्यक्‍ती कवडा गावातील रहिवासी असून सर्व पुरुष २१, २८, २५, २१ आणि २६ वर्षाचे आहेत. हे सर्वजन मुंबई येथून गावाकडे परतले आहेत. 

हेही वाचा - अत्याचार करणाऱ्या नराधमास शिक्षा

हिंगोली जिल्‍ह्यात कोरोनाचे एकूण २४८ रुग्ण झाले 

दोन व्यक्‍ती गुंडलवाडी गावातील रहिवासी असून दोघेही किशोरवयीन मुले वय १५ व १७ वर्ष आहे. यांचा परिवार ठाणेमधून गावी परतला आहे. आणी सर्वजण आल्यापासून क्‍वारंटाईन सेंटर मध्ये भरती आहेत. हिंगोली जिल्‍ह्यात कोरोनाचे एकूण २४८ रुग्ण झाले आहेत. त्‍यापैकी २२३ रुग्ण बरे झाल्यामुळे  त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. आज घडीला २५ रुग्णांवर उपचार चालु असल्याचे डॉ. श्रीवास 
यांनी सांगितले. 

मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे

हिंगोलीतील सर्व नागरीकांना आवाहान करण्यात येते की, अंत्यत इमरजन्सी असल्याशिवाय घराबाहेर पडू नये व अत्‍यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबून मोलाचे सहकार्य करावे तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे जणे करून आपल्या सभोवती कोरोना बाधीत रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते अशी मागणी डॉ. श्रीवास यांनी दिली. 

येथे क्लिक कराप्रीयकराने केला प्रीयसीचा खून...अन् अडकला...

रात्री उशीराने आठ जण कोरोना बाधीत 

दरम्‍यान, सोमवारी ११ रुग्णांना डिस्‍चार्ज देण्यात आल्याने जिल्‍ह्यात दिलासा मिळाला होता मात्र परत रात्री उशीराने आठ जण कोरोना बाधीत झाल्याने परत बाधीतांच्या संख्येत भर पडली आहे. यामुळे जिल्‍ह्यात कोरोनाचे मिटर कमी अधिक होणे सुरूच आहे. यात बाहेर गावातून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधीक आहे. मुंबई, पुणे व औंरगाबाद येथून जिल्‍ह्यात येणारे बहुतांश बाधीत निघत असल्याचे चित्र आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight new patients were added in Hingoli, hingoli news