बीड जिल्ह्यात एकाच दिवशी आठ पॉझिटीव्ह; रुग्णसंख्या ५५ वर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

  • ८५ गावांतील ९२ हजारांवर लोकांचे सर्वेक्षण
  • जिल्ह्याची रुग्णसंख्या रात्रीपर्यंत ४९ वर
  • पहिल्या दोन रुग्णांची प्रकृती ठणठणीत
  • जिल्ह्यात एकूण ४१ रुग्णांवर उपचार

बीड - दोन महिने कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात मागच्या शनिवारी (ता. १६) कोरोना रुग्ण सापडण्याचा सुरु झालेला सिलसिला थांबायला तयार नाही. सोमवारी (ता. २५) पाठविलेल्या ५७ पैकी ५० स्वॅब नमुन्यांचा अहवाल त्यादिवशीच निगेटीव्ह प्राप्त झाला परंतु, प्रलंबित सातपैकी दोन नमुन्यांचा अहवाल मंगळवारी (ता. २६) पुन्हा पॉझिटीव्ह आला.

दरम्यान, सोमवारी पाठविलेल्या अहवालांपैकी प्रलंबित असलेल्या सात पैकी दोन स्वॅबचे अहवाल दुपारी पॉझिटीव्ह आल्यानंतर सोमवारी सकाळी पाठविलेल्या स्वॅबच्या अहवालांत रात्री पुन्हा सहा जणांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. दुपारी शहरातील पॉझिटीव्ह आढळलेले दोघेही मुंबईहूनच आलेले आहेत. रात्री पॉझिटीव्ह आढळलेल्यांमध्ये परळीचे दोघे तर बीडच्या चौघांचा समावेश आहे. बीड शहरातील रुग्णांची संख्या १२ वर पोचली आहे.

हेही वाचा - सख्ख्या भावाच्या सात एकरांतील उसावर फिरविला ट्रॅक्टर

बीड शहरातील या नवीन दोन रुग्णांसह जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ४९ वर पोचली. परंतु, सर्वात पहिले आढळलेल्या दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्याची तयारी असल्याने ही जिल्हावासियांसाठी सुखद बातमी आहे. दोन रुग्णांना बुधवारी (ता. २७) कोरोनामुक्त म्हणून डिस्चार्ज शक्य आहे. मंगळवारी उशिरापर्यंत जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, माजलगावचे ग्रामीण रुग्णालय व केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४१ होती. तर, कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेल्या गावांसह परिसरातील ८५ गावांतील ९२ हजार ८०० लोकांचे सर्व्हेक्षण केल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली. तर, मंगळवारी जिल्ह्यातून ३० व्यक्तींचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. तर, पुर्वीच्या पाच नमुन्यांचा निष्कर्ष निघालेला नाही. 

हेही वाचा - बीड जिल्ह्यातील क्वारंटाईन व्यक्तीचा मृत्यू

सुरवातीचे दोन महिने कोरोनोमुक्त असलेल्या जिल्ह्यात मुंबई रिटर्नवाल्यांनी कोरोनाची भेट दिली. आतार्यंतच्या आढळलेल्या ४९ रुग्णांपैकी साधारण ४५ रुग्ण मुंबई/ठाणे येथील आहेत. दरम्यान, मागच्या शनिवारी दोन रुग्ण तर दुसऱ्याच दिवशी रविवारी पुन्हा सात रुग्ण आढळले. त्यानंतर एकाच दिवशी १३ आणि पुन्हा सात असा आकडा वाढत जाऊन आता ४९ वर पोचला आहे. यात एका कोरोनाग्रस्त वृद्धेचा मृत्यू झाला असून सर्वात पहिला आढळलेला कोरोनाग्रस्त उपचारानंतर बरा झाला आहे. मात्र, या टप्प्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी दोघांना बुधवारी डिस्चार्ज शक्य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight positives on the same day in Beed district; The number of patients is 55