

Eknath Shinde Assures Continuation of Ladki Bahin Yojana
Sakal
कन्नड: “लाडकी बहीण योजना ही माझी आवडती योजना आहे. विरोधक काहीही बोलोत, पण कोण आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,” असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता.१) रोजी व्यक्त केला. शहरातील पिशोर नाका येथे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. “सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. परंतु सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत.