esakal | Vidhan Sabha 2019: 'तुमचं थांबणं, पुढच्या पिढीला परवडणारं नाही'; प्रीतम मुंडेंचं भावनिक आवाहन

बोलून बातमी शोधा

BJP-MP-Pritam-Munde

पंकजा मुंडे यांच्या परळीतील निवासस्थानाबाहेरच त्यांनी महिला आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांच्या बहिण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Vidhan Sabha 2019: 'तुमचं थांबणं, पुढच्या पिढीला परवडणारं नाही'; प्रीतम मुंडेंचं भावनिक आवाहन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परळी : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी राष्ट्रवादीचे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय मुंडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा विषय केवळ परळी किंवा बीडमध्येच नाही तर, महाराष्ट्रात कालपासून गाजत आहे. रविवारी (ता.20) दुपारी पंकजा मुंडे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी आणि महिलांशी संवाद साधला. त्यावेळी महिलांनी तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा शब्दांत पंकजा यांना धीर दिला. 

पंकजा मुंडे यांच्या परळीतील निवासस्थानाबाहेरच त्यांनी महिला आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांच्या बहिण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ताई राजकारणात स्वतःसाठी नाही तर, तुमच्या आमच्यासाठी काम करत आहे. तिनं राजकारण थांबवणं, सगळ्यांना पुढच्या पिढीला न परवडणारं आहे, असं भावनिक वक्तव्य खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी या वेळी केलं. 

- वीरुच्या वाढदिवशी रोहित शर्माचा डबल धमाका

या वेळी महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठी होती. यावेळी प्रीतम मुंडेंनी उपस्थितांशी संवाद साधला.  तुम्ही खचू नका, धीर सोडू नका, आम्ही सर्वजणी तुमच्या सोबत आहोत, अशा प्रकारे  पंकजा मुंडेंना धीर देत त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असा धीर उपस्थित महिलांनी दिला.  

- बीड : धनंजय मुंडेंविरोधात महिलांनी काढले मूक मोर्चे

धनंजय मुंडेंचा खुलासा

दरम्यान, यापूर्वी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन वादग्रस्त व्हिडिओ क्लिपवर खुलासा केला. ते म्हणाले, 'काहीजण माझं कालचं भाषण एडिट करून बहिण-भावाच्या नात्यात विष कालवण्याचं काम करत आहेत. आम्ही विचारांमुळे वेगवेगळ्या पक्षात आहोत. सात वर्षांपूर्वी आमच्या बहिण-भावाच्या नात्यात फूट पडली.

तेव्हापासून मला खलनायक ठरवून समाजातून संपवण्याचं राजकारण केलं जात आहे.' त्यामुळे मला हे जग सोडून जावं वाटतंय. राजकारण सोडून जरी मी इथं राहिलो, तरी ते पुन्हा जमणार, अशा भावना धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केल्या.

- मला जग सोडून जावं वाटतंय; धनंजय मुंडेंना अश्रू अनावर