esakal | बीड ब्रेकिंग : केजमध्ये रोहयो घोटाळा, तिघे बडतर्फ, दोघांचे निलंबन तर बीडीओंची चौकशी. 
sakal

बोलून बातमी शोधा

रोहयो ११.jpg

बीड जिल्हा परिषदेचे सीईओ कुंभार यांची कारवाई.
समितीला रेकार्ड उपलब्ध न करुन देणे अंगलट. 
११४ गावांतील कामांची होणार तपासणी.
तपासणीसाठी २० पथकांची नियुक्ती. 

बीड ब्रेकिंग : केजमध्ये रोहयो घोटाळा, तिघे बडतर्फ, दोघांचे निलंबन तर बीडीओंची चौकशी. 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

केज (बीड) : बीड, आष्टी तालुक्यांपाठोपाठ आता केज तालुक्यातील रोहयो घोटाळा समोर आला आहे. पंचायत समितीअंतर्गत रोहयो घोटाळ्याची तक्रार केली. पण, चौकशी समितीला रेकॉर्डच उपलब्ध न करुन दिल्याने सीईओ अजित कुंभार यांनी केज तालुक्यातील सर्वच ११४ गावांतील मग्रारोहयो कामांच्या चौकशीचे आदेश दिले असून यासाठी २० पथकांची नेमणूकही केली आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
दरम्यान, रेकॉर्ड उपलब्ध करुन न देणे यासह इतर बाबींत दोषी आढळल्याने तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी सेवा समाप्ती आणि दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर, केज पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांचीही विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली. 
केज तालुक्यात मागच्या आणि यंदाच्या वर्षी महात्मा  गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून विविध कामे हाती घेण्यात आली. यात विशेषत: वृक्षलागवडीच्या कामांची संख्या अधिक आहे. या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. याच्या चौकशीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डी. बी. गिरी यांची चौकशी समिती नेमण्यात आली. श्री. गिरी यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी पंचायत समिती गाठली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र, ता. २२ जुलै आणि २५ ऑगस्ट या दोन वेळच्या भेटीत त्यांना कर्मचाऱ्यांनी रोहयोचे कुठलेच रेकॉर्डच उपलब्ध करुन दिले नाही. श्री. गिरी यांनी दिलेल्या अहवालावरुन तीन कंत्राटी कर्मचारी व दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये कनिष्ठ सहाय्यक ए. एस. डांगे, विस्तार अधिकारी एम. बी. गायकवाड यांचा समावेश आहे. तर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एस. यु. थोरात, सीडीओ एस. ए. बांगर व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व्ही. सी. मुंडे या तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीचे आदेश अजित कुंभार यांनी निर्गमित केले. तर, केज पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली. दरम्यान, बीड, आष्टी नंतर आता केज तालुक्यातील रोहयो घोटाळा समोर आला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रेकॉर्ड न देणे अंगलट; सर्वच गावांत चौकशी
दरम्यान, सुरुवातीच्या चौकशीवेळी दोन वेळा रेकॉर्ड दिले नाही. सुनावणीवेळीही रेकॉर्ड उपलब्ध न करुन देणे अंगलट आले. यामुळे दोघांचे निलंबन आणि तिघांची सेवा समाप्ती तर झालीच. पण, जर पंचायत समितीमध्ये रेकॉर्ड नाही तर गावांत कामे तरी झाली आहेत का, याची चौकशी करण्याचा निर्णय सीईओ कुंभार यांनी घेतला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच गावांत आता पथके चौकशी करणार आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) प्रदीप काकडे प्रमुख असलेल्या पथकात कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, उपअभियंता श्री. हाटकर व लेखाधिकारी श्री. आव्हाड यांचा समावेश आहे. एक पंचायत विस्तार अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी तसेच कृषीचे विस्तार अधिकारी अशी तिघांची २० पथके असून प्रत्येक पथके सहा गावांत कामांची पाहणी करतील तसेच मजूरांचेही जबाब नोंदविणार आहेत.