गोर-गरीबांच्या न्यायालयीन लढ्यांसाठी उमरग्यात विधी सल्ला व सहाय्यता केंद्राची स्थापना 

अविनाश काळे
Tuesday, 17 November 2020

अॅड. शितल चव्हाण यांचा पुढाकार. 

 

उमरगा (उस्मानाबाद) : शेतकरी, शेतमजूर, विधवा, परितक्त्या, अनाथ, अपंग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सामाजिक जाणीवेतून कायदेशीर सल्ला व न्यायालयीन खटले चालवण्यासाठी विधी सल्ला व सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. शहर व परिसरातील विधीज्ञ मंडळींनी यासाठी योगदान दयावे असे आवाहन केंद्राचे समन्वयक ॲड. शीतल चव्हाण यांनी केले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

उमरगा शहरात अँड. शितल चव्हाण यांच्या पुढाकारातुन  "लॉयर्स असोसिएशन फॉर जस्टीस (लॉज)" या विधी सल्ला व सहाय्यता केंद्राची स्थापना सोमवारी (ता.१६) बळीराजा गौरव दिनाचे औचित्य साधून करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जेष्ठ विधीज्ञ अॅड एम. डी. गायकवाड अध्यक्षस्थानी होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

समाजामध्ये अनेक वंचित घटक आहेत, त्यांना जगण्यासाठी अनेक अडचणी असतात, अशा स्थितीत कुटुंबात येणाऱ्या कांही कटू  प्रसंगाला कायदेशीर सल्ला आणि त्यांना न्याय देण्याची गरज असते. विधीज्ञ मंडळींनी सामाजिक जाणिव जोपासत त्यांना मदत करणे गरजेचे आहे. सर्वांच्या सहकार्याने केंद्राच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा अॅड. चव्हाण यांनी व्यक्त केली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या वेळी अॅड. गायकवाड, ॲड. नीतीन माळी, ॲड. बालाजी सोमवंशी, ॲड. ख्वाजा शेख, ॲड. योगेश जाधव, ॲड. अक्षय तोतला यांनी केंद्राचे कामकाज उत्तमरित्या चालवून समाजातील दुबळ्या घटकांना विधी क्षेत्रात सेवा पुरवण्याची ग्वाही देऊन ॲड. चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे शाहुराज माने, सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ, रोटरी क्लबचे सचिव अनिल मदनसुरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप जाधव, निवृत्त शिक्षक विश्वनाथ महाजन, ॲड. एस. एम. दामावले, ॲड. राजपूत  आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रा. युसुफ मुल्ला यांनी सुत्रसंचालन केले.  केंद्राचे समन्वयक करीम शेख यांनी आभार मानले.

(Edited By Pratap Awachar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment Legal Advice and Assistance Center Umarga