‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ची नांदेडला स्थापना

नांदेड महापालिका
नांदेड महापालिका

नांदेड - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात बाहेर गावावरुन येणाऱ्या नागरिकांची दिवसातून २४ तासांमध्ये केंव्हाही जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग, महापालिका आरोग्य विभाग येथून येणारे संदेश व सामान्य नागरीकांकडून येणारे संदेश प्राप्त होतात. नागरिकांची थर्मल मशिनने तपासणीसाठी झोननुसार ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ची स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन यांनी दिली.

महापालिकेने स्थापन केलेल्या या टीममध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संबंधित झोनमध्ये आलेल्या नागरीकांची तपासणी करुन अहवाल जंगमवाडी येथील रुग्णालयात सादर करणार आहेत. यामध्ये झोन क्रमांक, कार्यक्षेत्र, अधिकाऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, कर्मचाऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. 


नियुक्त अधिकाऱ्यांची झोननिहाय नावे 
झोन एक - सांगवी, तरोडा बुद्रुक ः डॉ. सचिन सिंघल - 727699194. दोन - तरोडा खुर्द ः डॉ. सचिन चांडोळकर-8007925809. तीन - जंगमवाडी - डॉ. भास्कर औराळकर 9527770300. चार - सहयोगनगर - डॉ. कल्याण पवार - 9960994440. पाच - शामनगर - डॉ. रमेश जाधव - 9673706043. सहा - दत्तनगर - डॉ. देवानंद देवसरकर - 9892072137. सात - खुशालसिंहनगर - डॉ. गजानन मुंनगीलवार - 9423440879, आठ - श्रावस्तीनगर - डॉ. रितेश बिसेन - 9850433391. नऊ - खडकपुरा - डॉ. शारेख खान - 9881126378, दहा - वजिराबाद - डॉ. विनोद चव्हाण - 922195847, अकरा - हैदरबाग - डॉ. राफे अन्सारी - 9552587338,  बारा - करबला - डॉ. रिजवान अहेमद - 9552587340, तेरा - इतवारा - डॉ. अशोक धबाले - 9011027235, चौदा - कौठा - डॉ. बालाप्रसाद कुंटूरकर - 9011027193, पंधरा - सिडको - डॉ. अब्दुल हमीद - 7741988742. यानुसार झोनमधील काही डॉक्टरांची नियुक्ती कोव्हीड १९ उपाययोजनेंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली आहे.

पंधरा झोन तयार करुन विभागणी
नांदेड वाघाळा महापालिका नांदेड झोन क्रमांक, झोनचे नाव व झोन अंतर्गत येणारे कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे आहे. १) झोन एक - तरोडा बुद्रुक सांगवी - तरोडा शिवरोड ते तरोडा बुद्रुक गाव व चैतन्यनगर रोड विमानतळ व सांगवी पूर्ण भाग. २) झोन दोन - तरोडा खुर्द - तरोडा शिवरोड ते तरोडा खुर्द गाव व तरोडा नाका ते महापालिका हद्द छत्रपती चौक. ३) झोन तीन - जंगमवाडी - राज कॉर्नर ते छत्रपती चौक डावाभाग ते काबरानगर पाणी शुध्दीकरण केंद्र डावा भाग ते गणेशनगर वाय पॉइंट ते महात्मा फुले मंगल कार्यालय डावा भाग ते राज कॉर्नर. ४) झोन चार - सहयोग नगर - राज कॉर्नर ते वर्कशॉप पाण्याची टाकी डावा भाग ते नागार्जुना हॉटेल डावा भाग ते हनुमान गड विमानतळापर्यंत. ५) झोन पाच - शामनगर - वर्कशॉप पाण्याच्या टाकीपासून ते आनंदनगर उजवा भाग ते महादेव दाळमील ते मस्तानपुरा रोड ते विष्णुनगर रोड उजवा भाग ते रेल्वे पटरी ते शिवाजीनगर दादरापर्यंत ते वर्कशॉप कॉर्नर उजवा भाग. ६) झोन सहा - दत्तनगर - आनंदनगर रोड डॉ. सोमाणी यांच्या दवाखान्यापासून ते महादेव दालमीलपर्यंत ते मस्तानपुरा रोड ते हिंगोली गेट ओव्हर ब्रिजपर्यंत डावा भाग ते दत्तनगर ते बाफना ओव्हरब्रिज ते एलआयसी ऑफिस ते नागार्जुना हॉटेल आनंदनगर रोड उजवा भाग. ७) झोन सात - खुशालसिंहनगर - विमानतळ नमस्कार चौक ते डॉ. आंबेडकरभवन ते कामठा चौक ते नवीन रेल्वे स्टेशनपर्यंत नमस्कार चौक ते एलआयसी ऑफिस डावा भाग ते बाफना ओव्हर ब्रीज डावाभाग पूर्ण ग्यानमाता शाळेचा मागचा भाग म्हाळजा टेकडी. 

झोननिहाय अधिकारी, कर्मचारी नियुक्त
८) झोन आठ - श्रावस्तीनगर - महात्मा फुले मंगल कार्यालय शिवाजीनगर ओव्हर ब्रिज उजवा भाग ते रेल्वे लाईन धरून श्रावस्तीनगर महापालिका हद्द ते काबरानगर पाणी शुध्दीकरण केंद्र ते महात्मा फुले मंगल कार्यालय उजवा भाग. ९) झोन नऊ - खडकपुरा - गोवर्धन घाट ते वजिराबाद चौक ते बसस्थानक, ओव्हर ब्रीज व पुर्वीचा खडकपुरा झोन. १०) झोन दहा - वजिराबाद - पूर्वीचा वजिराबाद झोन व वजिराबाद चौक, गोवर्धन घाट डावा भाग ते जूना मोंढा पुलापर्यंत ते भगतसिंग रोड बाफना ओव्हर ब्रिज ते बससॅण्डपर्यंत. ११) झोना अकरा - हैदरबाग - बाफना ओव्हर ब्रिज ते जुनापुल नदीपर्यंत संपूर्ण डावा भाग. १२) झोन बारा - करबला - किल्लापासून ते मोगडपल्ली ते पहेलवान टी हाउस ते देगलूर नाका ते जुनापुल नदीपर्यंत. १३) झोन तेरा - इतवारा - चौक ते कापूस संशोधन केंद्र रोड उजवा भाग इतवाराकडील भाग ते देगलूर नाकापर्यंत ते मनीयार गल्ली चौक पर्यंत उजवा भाग. १४) झोन चौदा - कौठा - जुना कौठा, नविन कौठा, वसरणी ते लातूर फाटा ते अर्सजन उजवा भाग. १५) पंधरा - सिडको - लातूर फाटा ते सिडको, हडको ते भिमवाडी वसरणी या प्रमाणे एकुण पंधरा झोनच्या विस्तारांतर्गत आरोग्य विभागाचे कार्यक्षेत्र आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन यांनी दिली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com