esakal | कोरोना मोहीमेत माजी सैनिकांनी सहभागी व्हावे

बोलून बातमी शोधा

file photo

विशेष मोहिमेत जिल्ह्यातील माजी सैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

कोरोना मोहीमेत माजी सैनिकांनी सहभागी व्हावे
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील माजी सैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

सध्या संबंध जग कोरोना या वैश्‍वीक महामारीने त्रस्त आहे. या आजाराला रोखण्यासाठी आतापर्यंत कुठलेचे औषध उपलब्ध झाले नसल्याने हा आजार आपेल हायपाय पसरत आहे. जगातील अमेरिकासह आदी महासत्ता असलेल्या राष्ट्रसुध्दा हतबल झाले आहेत. पोलिस, आरोग्य विभागासह जवळपास सर्वच शासकिय यंत्रणा या आजाराचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांच्या सेवेत रात्रंदिवस झटत आहे. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

हेही वाचा - उत्पादन शुल्कने पकडली सहा लाखाची दारु

सैनिकी सेवेत असतांना आपण प्रशिक्षीत 

सैनिकी सेवेत असतांना आपण प्रशिक्षीत असल्याने अशा या महाभंयकर संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या अनुभवाची आवश्‍यकता आहे. त्या अनुभावाचा लाभ जिल्ह्यातील नागरिकाना व्हावा यासाठी आपणास आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रमुख तथा परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

नर्सींग व पॅरामेडीकल सेवा, रुग्णवाहिका चालविण्याचा अनुभव
 
कोरोना कोव्हीड -१९ चा प्रादूर्भाव रोखण्याच्या शासनाच्या मोहिमेत माजी सैनिकांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यानुषंगाने सैनिक कल्याण कार्यालय पूणे यांनी निर्देशीत केल्याप्रमाणे जिल्हा सैनिक कार्यालय हे इच्छुक माजी सैनिकांची यादी तयार करत आहे. सैन्यसेवेचा प्रदिर्घ अनुभव असलेले विविध पदावर कार्यरत होऊन निवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. ज्यांना नर्सींग व पॅरामेडीकल सेवेचा तसेच रुग्णवाहिका चालविण्याचे अनुभव आहे त्यांनी आपली सहमती द्यावी. 

येथे क्लिक करा - ज्योतिषी म्हणतात, या तारखेला होईल भारत कोरोनामुक्त...

माजी सैनिक ६० वर्षाखाली व मेडीकल फिटनेस असावा

तसेच इतर माजी सैनिकांनी व्यवस्थापन व अनुशासनासाठी आपण पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे माजी सैनिकाचे वय ६० वर्षाखाली व मेडीकल फिटनेस सेफ असावे. या मोहीमेत सहभागी होणाऱ्या माजी सैनिकानी व्हाटसअप (९४०३०६९४४७) व चलभाष क्रमांक ( ८३७९०६०८३७) वर संपर्क साधावे असे आवाहन माजी सैनिक कल्याण कार्यालयाचे संघटक कमलाकर शेटे यांनी केले आहे.