esakal | पंकजांना ऑफर देणाऱ्या खोतकरांना विचारतंय कोण? फडणवीसांनी उडविली खिल्ली. 
sakal

बोलून बातमी शोधा

000000.png

खडसेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून विशेषत: माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी दिलेल्या शिवसेना ऑफरची फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे. पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे, असे म्हणणार्या अर्जुन खोतकरांना कोण विचारतंय? ते कसली ऑफर देताय. त्यांची अवस्था काय आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्यासोबत मी कामही केले आहे. पण त्यांना विचारतंय तरी कोण असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी खोतकरांची चांगलीच खिल्ली उडविली आहे.     

पंकजांना ऑफर देणाऱ्या खोतकरांना विचारतंय कोण? फडणवीसांनी उडविली खिल्ली. 

sakal_logo
By
प्रताप अवचार

औरंगाबाद : एकनाथ खडसे जे सांगतायेत ते अर्धसत्य आहे. पुर्ण सत्य योग्य वेळ आल्यावर मी सांगेन, सध्या मात्र मला त्याबद्दल काहीच बोलायचे नाही. जऴगाव जिल्ह्यात खडसे गेल्याने काहीही फरक पडणार नाही. जळगाव जिल्हा कायम भाजपचा गड राहीला आहे. असे देवेंद्र फडणवीस औरंगाबादेत म्हणाले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विशेष म्हणजे खडसेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून विशेषत: माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी दिलेल्या शिवसेना ऑफरची फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे. पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे, असे म्हणणार्या अर्जुन खोतकरांना कोण विचारतंय? ते कसली ऑफर देताय. त्यांची अवस्था काय आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्यासोबत मी कामही केले आहे. पण त्यांना विचारतंय तरी कोण असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी खोतकरांची चांगलीच खिल्ली उडविली आहे.     

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यात पंकजा मुंडे यांचेही नाव घेतले जाते. यामुळे माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना खोतकरांना टोला लगावला आहे. खोतकरांच्या ऑफरची देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली. त्यांनी म्हटले आहे की, त्या अर्जुन खोतकरांना कोण विचारतय? ते कसली ऑफर देत आहेत? 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जळगाव भाजपाचा गड 
जळगाव जिल्ह्यात खडसेंच्या जाण्याने पक्षावर काय फरक पडेल, म्हणाल तर कुठलाही पक्ष हा मोठाच असतो, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जोरावर तो मोठा झालेला असतो. जळगाव जिल्हा मुळातच भाजपचा गड आहे. तो खडसेच्या जाण्यानंतरही कायम राहील, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.