पाकिस्तानमधून आलेली गीता आमचीच मुलगी, जिंतूरच्या वाघमारे कुटुंबीयांचा दावा

गणेश पांडे
Tuesday, 12 January 2021

परभणीतही नुकताच गीताच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात आला होता. भारतातून चुकून रेल्वेमार्गाद्वारे पाकिस्तानात गेलेल्या गिताने स्वतःच्या कुटूंबाचा शोध घेण्याची मोहिम सुरु केली आहे.

परभणी : पाकिस्तानमधून आलेल्या मुकबधिर गीताचे आपण पालक असल्याचा दावा जिंतूर येथील एका कुटूंबाने केला आहे. या दाव्यानंतर गीतासह संपूर्ण टीम जिंतूरला गेली. तेथे वाघमारे कुटूंबियांची भेट घेवून पडताळणी केली असता बऱ्याच गोष्टी जुळत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, वाघमारे कुटूंबियांचे डिएनए चाचणी केल्यानंतरच पुढचा निर्णय घेण्याचे टीमने ठरविले आहे.

मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

२०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने तिला भारतात आणण्यात आले. इंदूरच्या आनंद व मोनिका पुरोहित यांच्या आनंद सर्व्हिस सोसायटीत ती राहत आहे. सांकेतिक भाषातज्ज्ञ ज्ञानेंद्र यांनी संवाद साधल्यावर गीताचे गाव मराठवाडा-तेलंगणा सीमेवर असल्याचे संकेत मिळाले. परभणीतही नुकताच गीताच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात आला होता. भारतातून चुकून रेल्वेमार्गाद्वारे पाकिस्तानात गेलेल्या गिताने स्वतःच्या कुटूंबाचा शोध घेण्याची मोहिम सुरु केली आहे.

हे ही वाचा : कुरुंदा बाजरपेठेत भर दिवसा चोरी, व्यापाऱ्याचे दोन लाख रुपयेे लंपास

जिंतूरच्या मीना वाघमारे-पांढरे यांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे. गीताच्या शरीरावर जळाल्याची खूण असल्याचे मीना सांगतात. तशीच खूण गीताच्या शरीरावरही आहे. मीना वाघमारे सध्या औरंगाबादच्या वाळूज-पंढरपूर येथे राहतात. गीता येत असल्याचे समजल्यावर त्या जिंतूरला तिला भेटण्यासाठी आल्या होत्या. गीता मात्र वाघमारे कुटुंबीयांना ओळखण्यास नकार देत आहे. दरम्यान, वाघमारे कुटूंबियांशी गीताचे डीएनए जुळतात का ते पाहिल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A family from Jintur has accepted the guardianship of Mukbadhir Geeta