उदगीरात फार्म हाऊसवर दरोडा, चाकूचा धाक दाखवून साडेचार लाखांचे दागिने लुटले!

युवराज धोतरे
Friday, 6 November 2020

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बनशेळकी तलावाशेजारी जलशुद्धीकरण केंद्र जवळ असलेल्या सुभाष नेत्रगावकर (वय-७८) यांच्या घरी गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास नवरा बायको घरी असताना अज्ञात दोन बुरखाधारी चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

उदगीर (लातूर) : शहरालगत असलेल्या बनशेळकी तलावा जवळील नगर पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला लागून असलेल्या फार्म हाऊसवर गुरुवारी (ता.५) सायंकाळी सातच्या सुमारास धाडसी दरोडा पडला आहे. अज्ञात दोन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून साडेचार लाख रुपयाच्या जाण्याची लूट केली आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

याबाबत ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बनशेळकी तलावाशेजारी जलशुद्धीकरण केंद्र जवळ असलेल्या सुभाष नेत्रगावकर (वय-७८) यांच्या घरी गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास नवरा बायको घरी असताना अज्ञात दोन बुरखाधारी चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यांनी श्री नेत्रगावकर यांना चाकू लावला व त्यांच्या बायकोच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे गंठण ज्याची किंमत दोन लाख रूपये व पाच तोळे सोन्याच्या हातातील पाटल्या ज्याची किंमत अडीच लाख रूपये असा एकूण साडेचार लाख रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले आहेत.
याप्रकरणी श्री नेत्रगावकर यांच्या फिर्यादीवरून येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शुक्रवारी (ता.६) लातूरचे श्वान पथक सकाळी साडेनऊच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा मागोवा घेत आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री सिंगनकर अधिक तपास करत आहेत.

अप्पर पोलीस अधीक्षक उदगीरात
अप्पर  पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव हे उदगीर शहरात गुरुवारी रात्री आठ पासून ठाण मांडून आहेत. उदगीर शहरात दोन दिवसा पुर्वी  झालेली धाडसी चोरी व साडेचार लाखाचा पडलेला धाडसी दरोडा या घटनांच्या संदर्भाने जिल्हा पोलीस अधीक्षक उदगीरात तळ ठोकून असल्याचे दिसून येत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farm house Robbery looting jewelery 4.5 lakh with knife Udgir news