esakal | अतिवृष्टी, कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo
  • बीड जिल्ह्यातील निपाणी टाकळीची घटना 
  • अतिवृष्टीमुळे संपूर्ण अर्थचक्र कोलमडले 
  • बॅंकेकडून वसुलीसाठी सतत तगादा 

अतिवृष्टी, कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माजलगाव (जि. बीड) - बॅंकेच्या कर्जास कंटाळून माजलगाव तालुक्‍यातील निपाणी टाकळी येथील शेतकरी नारायण अप्पाराव सोळंके (वय 50) यांनी शुक्रवारी (ता. 22) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, तालुक्‍यातील निपाणी टाकळी येथील शेतकरी नारायण सोळंके यांच्याकडे बॅंकेचे कर्ज होते. बॅंकेकडून वसुलीसाठी सतत तगादा असल्याने हा शेतकरी अडचणीत होता. सातत्याने निर्माण होणारा दुष्काळी व अतिवृष्टीमुळे संपूर्ण अर्थचक्र कोलमडले होते.

हेही वाचा - नुकसानभरपाईच्या निधीत वाढ

प्रापंचिक खर्च कसा भागवावा, या विवंचनेतच नारायण सोळंके गुरुवारी (ता. 21) घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी आलेच नाही. सर्वत्र शोधाशोध घेऊनही ते कुठेच सापडले नाहीत. निपाणी टाकळी शिवारातील शेतात बाभळीच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा - मराठवाड्यात आज नुकसानीची पाहणी

याप्रकरणी पुतण्या श्रीकिसन शिवाजी सोळंके यांच्या माहितीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

loading image
go to top