
तरूण शेतकऱ्याची नापिकी, कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील राजेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी (Farmer) रामचंद्र धुराजी गरड (वय ३८) या तरूण शेतकऱ्याने बॅंकेचे कर्ज, खासगी सावकाराचे कर्ज व शेतातील नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (ता.२४) पहाटे घडली आहे. सतत होत असलेल्या वातावरणातील बदल, कोरडा, ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोय. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. परंतु शासन अल्पप्रमाणात मदत करते. त्यामुळे शेतामध्ये केलेला खर्च निघणे देखील मुश्किल असल्याची (Majalgaon) परिस्थिती आहे. तालुक्यातील राजेगाव येथील शेतकरी रामचंद्र गरड या शेतकऱ्याकडे बॅंकेचे व सावकाराचे कर्ज होते. (Farmer End Himself In Majalgaon Of Beed District)
हेही वाचा: Aurangabad Politics| औरंगाबादेत भाजपचे मलिकांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन
ते कसे फेडावे या विंवचनेतुन या शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन राजेगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रामचंद्र यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. (Beed)
Web Title: Farmer End Himself In Majalgaon Of Beed District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..