खुशखबर, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

शासनाकडून शेतकरी व नागरिकांना देण्यात येणारे अनुदान संबंधीतांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. रक्कम काढण्यासाठी संदेश प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारपासून (ता. तीन) तारखा घोषित करण्यात आल्या. खातेदारास एसएमएसद्वारे पैसे संबंधित खात्यात जमा झाल्याची दिली जाणार असल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांनी दिली. 

बीड : शासनाकडून शेतकरी व नागरिकांना देण्यात येणारे अनुदान संबंधीतांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. रक्कम काढण्यासाठी संदेश प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारपासून (ता. तीन) तारखा घोषित करण्यात आल्या. खातेदारास एसएमएसद्वारे पैसे संबंधित खात्यात जमा झाल्याची दिली जाणार असल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांनी दिली. 

गुरुवारपासून (ता. दोन) दहा एप्रिलपर्यंत बँक खात्यांत अनुदान जमा होणार आहे. शुक्रवारपासून (ता. तीन) अकरा एप्रिलपर्यंत त्यांना ही रक्कम काढता येणार आहे. ज्या खातेदाराचा खाते क्रमांकाचा शेवटचा क्रमांक शुन्य (०) व एक (१) असेल त्यांच्या खात्यात गुरुवारपासून रक्कम जमा होऊन ती तीन व चार एप्रीलला काढता येईल.

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

ज्यांचा खाते क्रमांकाचा शेवटचा क्रमांक दोन (२) व तीन (३) असेल अशा ग्राहकांचे अनुदान चार एप्रिलला जमा होऊन ती रक्कम पाच व सहा एप्रीलपासून काढता येईल. खाते क्रमांकाचा शेवटचा क्रमांक चार (४) व पाच (५) असल्यास ता. सहा एप्रिलला अनुदान जमा होऊन ती रक्कम ता. सात व आठ तारखेला काढता येईल. 

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

तर ज्यांचा खाते क्रमांकाचा शेवटचा क्रमांक सहा (६) व सात (७) आहे त्यांचे अनुदान आठ एप्रिलला जमा होऊन ती रक्कम नऊ व दहा एप्रिलला काढता येईल. खाते क्रमांकाचा शेवटचा क्रमांक आठ (८) व नऊ (९) असल्यास १० रोजी अनुदान जमा होऊन ते ११ एप्रिलला काढता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer To Get Subsidy In Bank Account Beed News

Tags
टॉपिकस
Topic Tags: