
हिंगोली : शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेतकरी मानखुर्द ते मंत्रालय असे २० किलोमीटर अंतर अर्धनग्न चालून बुधवारी (ता. १२) मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहेत. त्यासाठी मंगळवारी (ता. ११) हिंगोलीत आंदोलन करून शेतकरी मुंबईकडे रवाना झाले आहेत.