नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातच शेतकऱयांचा ठिय्या

हरी तुगावकर
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

लातूर : पिक विमा मंजूर होऊनही शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही. यातून चाकूर तालुक्यातील काही शेतकऱय़ांनी बुधवारी (ता. २९) येथील नॅशनल इन्शुरन्स कार्यालयातच ठिय्या घातला. तसेच शाखा व्यवस्थापकाला घेरावही घातला.

लातूर : पिक विमा मंजूर होऊनही शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही. यातून चाकूर तालुक्यातील काही शेतकऱय़ांनी बुधवारी (ता. २९) येथील नॅशनल इन्शुरन्स कार्यालयातच ठिय्या घातला. तसेच शाखा व्यवस्थापकाला घेरावही घातला.

या तालुक्यातील नळेगाव सर्कलमधील गावांना १३ हजार ६९२ रुपये विमा मंजूर झाला आहे. पण शेतकऱयांच्या खात्यावर मात्र अकराशे ते अडीच हजार रुपयेच जमा होत आहेत, त्यामुळे शेतकऱयात असंतोष आहे. यावर्षी पिक विम्याचा पहिल्यापासून गोंधळ सुरु आहे. शेतकऱय़ांनी पैसे भरूनही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या याद्या अपलोडच होऊ शकल्या नाहीत. शासन, विमा कंपनी यांच्या कारभारात शेतकरी मात्र भरडले गेले आहेत. 

विमा हप्ता भरूनही त्यांना पिक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे. चाकूर तालुक्यातील नळेगाव सर्कलमध्ये असाच प्रकार घडला आहे. या सर्कलसाठी १३ हजार ६९२ रुपये विमा मंजूर झाला आहे. पण कंपनीने मात्र शेतकऱयांच्या
खात्यावर केवळ अकराशे ते अडीच हजार रुपयेच जमा केले आहेत. त्यामुळे या शेतकऱयांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या येथील कार्यालयातच बुधवारी ठिय्या आंदोलन केले. शाखा अधिकाऱयांना घेरावही घातला आहे. पूर्ण विमा मिळावा
अशी शेतकऱयांची मागणी आहे.

''यावर्षी दोन लाख दहा हजार शेतकऱयांच्या याद्या अपलोड होण्यात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे पहिल्या यादीत शेतकऱ्यांची नावे आली नाहीत. त्यानंतर दुसऱया यादीत देखील ३० ते ५० टक्के पिक विमा कमी आला आहे. या
संदर्भात दिल्ली, मुंबई व कोलकता येथे कंपनीच्या वरिष्ठांकडे मेल केला आहे. शेतकऱयांना फटका बसणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे''.

- विजय पस्तापुरे, शाखा व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स

नळेगाव सर्कलमध्ये १३ हजार ६९५रुपये विमा मंजूर आहे. पण कंपनीने अकराशे रुपये खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱयांनी पैसे भरूनही त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे.

- गोविंद शेळके, शेतकरी, महाळंग्रावाडी (ता. चाकूर).

वडवळ सर्कलमध्ये २० ते २५ गावे आहेत. या गावातील बहुतांश शेतकऱयांनी पिक विमा हप्ता भरलेला आहे. पण एकाही शेतकऱयाला पिक विमाच मिळाला नाही. वारंवार कंपनीकडे हेलपाटे घालत आहोत. रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.
पण उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

- राजाभाऊ शिंदे, शेतकरी, गांजूर (ता. चाकूर)

Web Title: Farmers Aggressive Ahead on Insurance company