रेशीम शेती म्हणजे 'घाटे का सौदा' !

वैभव पाटील
Wednesday, 7 October 2020

रेशीम कोषाचा भाव प्रतिकिलो साडे तीनशेवरून सध्या १५० ते २०० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

नायगांव  (उस्मानाबाद) : मागील सहा महिन्यांपासून कोषाचे उत्पादन वाढले, त्यातच भावही कोसळल्याने रेशीम शेती आता घाटे का सौदा ठरू लागली आहे.
 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शेतकरी उत्पन्न वाढीसाठी विविध पर्यायांचा शोध घेतोय. काही वर्षापासून तुती लागवडीतून रेशीम कोष निर्मितीकडे शेतकरी वळले आहेत. यातून शाश्वत उत्पन्न मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी प्रगती साधली. नायगांवसह पाडोळी, वडगांव, पिंपरी, जायफळ, बोरगांव, रायगव्हाण, निपाणी येथील तिनशे शेतकऱ्यांनी ३२० एकरावर तुती लागवड केली आहे. ती फायद्याची पण ठरत होती, परंतु कोरोनाच्या परिस्थितीत रेशीम कोषाचा भाव प्रतिकिलो साडे तीनशेवरून सध्या १५० ते २०० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुतीची लागवड फायद्याची ठरत नसल्याने तुती ठेवावी की काढावी असा प्रश्न रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांनी कर्नाटकातील बाजारपेठेचा आधार घेतला होता. त्याचा या उत्पादकांना दराचा फायदाही मिळाला, गेल्या सहा महिन्यापासून रेशीम कोषाचे उत्पादनही वाढले मात्र कोरोनामुळे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आर्थिक नुकसान 
कोरोना मुळे रेशीम शेती घाटेका सौदा बनली आहे. आजूनही रेशीम कोषाचे दर न वधारल्याने सहा महिन्यात प्रत्येक रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयाचा घाटा सहन करावा लागत आहे. 

 

तुतीपासून रेशीमकोष तयार करण्यासाठी लागणारे अंडपुंज, विजेता, चुना, आसत्रा व इतर साहित्यासाठी लागणारा खर्च सरकारने करावा व आर्थिक संकटात सापडलेल्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे.- बापू काळे उत्पादक 

 पारंपारिक पीकात बदल करुन मोठ्या चिकाटीने रेशीम तुतीची लागवड केली. सुरवातीला चांगला दरही मिळाला आता कोरोनाने या व्यवसायाला उतरतीकळा लागली आहे. आता शासनाने शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे.- बापु मोरे उत्पादक 

(Edited By Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers Loss due to silk farming