थकीत ऊस बिलासाठी वारंवार चकरा, शेतकऱ्याच्या पदरी निराशा

robbery from sugar cutters & vehicle owners; Sugarcane growers are poor
robbery from sugar cutters & vehicle owners; Sugarcane growers are poor

कळंब (जि.उस्मानाबाद) : शेतकरी (Farmer) हा जगाचा पोसिंदा असून ऊस उत्पादक शेतकऱ्यामुळेच तालुक्यातील हावरगाव येथील डीडीएन शुगर युनिट दोन या कारखान्याची उलाढाल वाढली. कारखान्याच्या व्यवस्थापनाला राजकारणात फायदा मिळाला. मात्र,शेतकऱ्यांना या कारखान्याने वाऱ्यावर सोडले असून ऊस बिलासाठी वारंवार चकरा मारून ऊस उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडी आले आहेत. कारखान्याकडून देण्यात आलेले धनादेश बॅंकेत वटत नसल्याने शेतकरी आता (Sugar Cane Payment) आत्महत्याच्या उंबरठ्यावर आहेत. तालुक्यातील हावरगाव येथील शंभू महादेव साखर कारखाना हा भाजपचे आमदार व मुरुड येथील दिलीप नाडे यांच्या डीडीएन शुगरने विकत घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवस चांगले येतील अशी अपेक्षा होती. गेल्या वर्षी गाळप केलेल्या ऊसाची देयके थकली आहेत. वारंवार चकरा मारून ही शेतकऱ्यांच्या (Osmanabad) पदरी निराशा पडत आहे. आमदाराकडे थकीत देयकाची मागणी करावी तर ते नाडे कंपनीकडे जावा असे म्हणत आहेत. त्यामुळे ऊस बिलासाठी दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न शेतकऱ्याना पडला आहे. मधल्या काळात देयकासाठी बोभाटा (Kalamb) झाल्यावर कारखान्याने एक महिन्याची आगाऊ तारीख टाकून धनादेश वाटप केले. धनादेश दिल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. ज्या तारखेचा धनादेश दिला. त्या तारखेपर्यत शेतकऱ्यांनी धनादेश जपून ठेवून धनादेश बॅंकेत दिला. मात्र, बॅंकेतील खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने वटले नाहीत.

robbery from sugar cutters & vehicle owners; Sugarcane growers are poor
अर्धापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळीच्या बागा उद्ध्वस्त

शेतकऱ्याच्या घामाचे पैसे सांगलीच्या डिस्टलरीत लावल्याची चर्चा

२०२०-२१ या गाळप हंगामात डीडीएन शुगरकडून सुमारे पावणेदोन लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. मोठ्या प्रमाणावर ऊसाचे गाळप करून ही शेतकऱ्याना वेळेत ऊस बिले दिली नाहीत. आजही शेतकरी, ऊस पुरवठादार, वाहतुकदारांची सुमारे ७ कोटी रुपये या करखान्याकडे थकीत असल्याची चर्चा आहे. कारखान्याच्या एका व्यवस्थापनाकडून येथील शेतकऱ्याच्या घामाचे पैसे सांगलीत विकत घेतलेल्या डिस्टलरीत लावल्याची, तर दुसऱ्या व्यवस्थापनाने माजलगाव येथे साखर कारखाना सुरू करण्यात रक्कम लावल्याची चर्चा आहे.

मुंबईहून आरटीजीएस होते म्हणे

पाच कोटी रुपयांच्या जवळपास शेतकऱ्यांना ऊस बिलासाठी धनादेश दिले असून धनादेश न वटल्यास धनादेश कारखान्यावर जाऊन परत केल्यास ती रक्कम मुंबईहुन शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर आरटीजीएसद्वारे सोडली जात असल्याची चर्चा आहे.

robbery from sugar cutters & vehicle owners; Sugarcane growers are poor
अमरावतीत हॉटेलला भीषण आग; मोठ्या प्रमाणात हानी

वारंवार चकरा मारूनही ऊस बिल मिळेना

गेल्या वर्षी हावरगाव येथील डीडीएन शूगरला ऊस गळपसाठी दिला होता. माझ्या वडीलाचे वर्षश्राद्ध तीन दिवसांवर आले आहे. ऊस बिलासाठी रडलो, तडफडलो तरी देखील कारखाना व्यवस्थापनाकडून दखल घेतली नसल्याचे ऊस उत्पादक शेतकरी महेश आडसुळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com