esakal | कोथिंबीर लागवडीतून शेतकऱ्यांनी शोधला आर्थिक समृद्धीचा मार्ग
sakal

बोलून बातमी शोधा

औसा तालुक्यात कोथिंबीर लागवडीचे प्रमाण वाढले आहे.

कोथिंबीर लागवडीतून शेतकऱ्यांनी शोधला आर्थिक समृद्धीचा मार्ग

sakal_logo
By
जलील पठाण.

औसा (जि.लातूर) : चाळीस दिवसांत एकरात लाख रुपयाच्या वर उत्पादन देणारी कोथिंबीर Coriander plant औसा तालुक्यातील Latur शेतकऱ्यांना लखपती व्हायचा मार्ग दाखवत आहे. एवढ्या कमी दिवसात दुसरे कुठलेही पिक कोथिंबीरसारखे उत्पादन देत नाही. तालुक्यातील बहुतांश शेतकरी याकडे वळलेले दिसून येत आहेत. तालुक्यात शेकडो एकरावर याची लागवड होत असल्याने औसा Ausa तालुका कोथिंबीर उत्पादनाचे केंद्र बनत आहे. लवकर लखपती होण्याचा मार्ग ही कोथिंबीरीची शेती शेतकऱ्यांना दाखवित आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात ही शेती विस्तारतांना दिसत आहे. अस्सल गावरान आणि घमघमीत सुगंध असणाऱ्या औशाच्या कोथिंबीरीला देशातल्या विविध राज्यात चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांबरोबरच Famer व्यापारीही चांगले पैसे कमावत आहेत.farmers of ausa tahsil take coriander produce marathi news

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत रिमझिम सरी, मुसळधार पावसाची शक्यता

नेहमी अवर्षण, गारपीट, दुष्काळ याचा सामना येथील शेतकरी करीत आहेत. त्यातच लातूर जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या औसा तालुक्यातल्या आहेत. शेती परवडत नाही. अनेकांनी शेती विकलीही. मात्र यावर उपाय नाही काढणार तो औशाचा शेतकरी कसला?गेल्या पाच वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या पिक पद्धतीत बदल केला. वर्षातून दोन ते तीन पिक कोथिंबीरीचे घेतले जाऊ लागले. अस्सल गावरान कास्ती बियाण्यांचा वापर करण्यात येऊ लागला. या वाणाची खास गोष्ट अशी आहे की याचा सुगंध आणि चव इतर वाणांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह Western Maharashtra विदर्भ Vidarbh, तेलंगाना Telangana, ओडिशा Odisha, पश्चिम बंगाल West Bengal, खानदेश Khandesh या भागात औशाच्या कोथींबीरीला मागणी वाढली.

हेही वाचा: Nanded : नांदेडला भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

पेरणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांत हे पिक काढायला येत असल्याने व बाजार तेजीत असतांना एकराला लाख ते दीड लाख दर मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या शेतीकडे वळले. परिणामी गावागावात याचा प्रसार झाला आणि प्रत्येक गावात ही कोथिंबीर शेती बहरु लागली. एकरी चार हजाराचे वीस किलो बियाणे, बाराशे रुपयांचे खत, आठशे रुपये पेरणी, तीन हजार रुपये खुरपणी व तीन हजार रुपये फवारणी असा बारा ते पंधरा हजार रुपये खर्च येणारे हे पिक दर चांगले असताना लाख ते दीड लाख रुपये देऊन जाते. आज देशातल्या अनेक भागात औशाची गावरान कोथिंबीर ही नावाने ओळखली जात असून औसा तालुका आता कोथिंबीर पिकाचे उत्पादन केंद्र बनत आहे. करजगाव (ता.औसा) येथील कोथिंबीर उत्पादक शेतकरी म्हणाले की, कमी कालवधीत लाखोंचे उत्पादन देणारे हे पिक म्हणजे मटका आहे. जर भाव चांगला असला तर चांगले पैसे मिळतात अन् दर घसरले तर व्यापारी याला हात लावत नसल्याने सरळ कुळवून टाकावी लागते.

हेही वाचा: हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के,भूगर्भातून आवाज

कोथींबीर पिकाच्या दर्जाबाबत औसा नावारुपाला येत असुन येथील शेतकरी अभ्यासपूर्ण कोथिंबीरीची जोपासना करीत आहेत. त्यामुळे देशातल्या अनेक भागात याची मागणी वाढत आहे. या कोथींबीरीला सुगंध आणि लुसलुशीतपणा असल्याने ग्राहक देखील औशाची कोथींबीर आहे का असे विचारताना दिसुन येतात.

- अमीर पटेल, व्यापारी

loading image