esakal | वाद मिटविण्यासाठी मध्ये पडला अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

धानोरा जहागीर येथील चौघांनी काही अंतरावर जाऊन श्री. चंद्रवंशी यांची मोटरसायकल थांबवून तुम्ही आमच्या सोबत का वाद घातला, असे म्हणत अविनाश चंद्रवंशी व दत्ता सपकाळ यांना काठीने मारहाण केली.

वाद मिटविण्यासाठी मध्ये पडला अन्...

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली) : शुल्लक कारणावरून होणारा वाद मिटवण्यासाठी मध्ये पडल्याच्या कारणावरून दोघांना मारहाण करीत त्यांच्याकडील नगदी पाच लाख ६५ हजार रुपये पळविल्याची घटना कळमनुरी धानोरा जहांगीर मार्गावर घडली. याप्रकरणी सोमवारी (ता. १५) रात्री उशिरा कळमनुरी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिस दिलेल्या माहितीप्रमाणे सुकळी वळण येथील दत्ता सपकाळ व यादव भोजे कळमनुरी येथून शनिवार (ता. १३) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या गावाकडे परत जात होते. 

हेही वाचातेराशे रुपयांची लाच घेताना कृषी सहायक जाळ्यात -

शाब्दिक चकमक होऊन हाणामारी

या मार्गावर असलेल्या धानोरा जहांगीर येथील प्रदीप बरडे, प्रवीण पाईकराव, मनोज मोरे, सूरज दांडेकर यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली. याचवेळी सुकळी वळण येथील अविनाश चंद्रवंशी हा गावाकडे निघाला असताना घटनास्थळी पोचला.

मोटरसायकल थांबवून काठीने मारहाण 

 त्याने आपल्या गावातील मित्रांशी सुरू असलेल्या वादात मध्यस्थी केली. तसेच भांडणं सोडविले. मात्र, याच गोष्टीचा राग धरून भांडण करणाऱ्या धानोरा जहागीर येथील चौघांनी काही अंतरावर जाऊन श्री. चंद्रवंशी यांची मोटरसायकल थांबवून तुम्ही आमच्या सोबत का वाद घातला, असे म्हणत अविनाश चंद्रवंशी व दत्ता सपकाळ यांना काठीने मारहाण केली.

बॅगमध्ये पाच लाख ६५ हजार रुपये 

 या घटनेत हे दोघेही जखमी झाले. या भांडणांमध्ये श्री. चंद्रवंशी यांच्याकडे असलेली काळी बॅग हिसकावून त्यांनी पळ काढला. या बॅगमध्ये पाच लाख ६५ हजार रुपये नगदी असल्याचे श्री. चंद्रवंशी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

पोलिसांची घटनास्थळी भेट

दरम्यान, अविनाश चंद्रवंशी याच्या तक्रारीवरून मारहाण करून पाच लाख ६५ हजार रुपये पळविल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी सोमवार रात्री उशिरा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. वैंजने, पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

येथे क्लिक करागंभीर प्रकरण, पोलिस उपनिरीक्षकाची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना चुकीची वागणुक -

आरोपींना घेतले ताब्यात

पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, कर्मचारी गणेश सूर्यवंशी, निरंजन नलवार, शिवाजी पवार, एस. टी. गायकवाड करीत आहेत. याप्रकरणी उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने हालचाली करून घटनेतील आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.