जालन्याला धक्का : कोरोनाची पन्नाशी पार, पुन्हा सात पॉझिटिव्ह

महेश गायकवाड
Friday, 22 May 2020

शहरात कोरोना बधितांच्या संख्येत शुक्रवारी (ता.२२) पुन्हा सात रुग्णांची भर पडली असून आता एकूण बाधितांची संख्या ५१ झाली आहे. नव्याने बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये दोन खासगी हॉस्पिटलमधील मिळून पाच आरोग्य कर्मचारी, राज्य राखीव दलातील एक जवान व पेवा (ता.मंठा) येथील एका महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

जालना: शहरात कोरोना बधितांच्या संख्येत शुक्रवारी (ता.२२) पुन्हा सात रुग्णांची भर पडली असून आता एकूण बाधितांची संख्या ५१ झाली आहे. नव्याने बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये दोन खासगी हॉस्पिटलमधील मिळून पाच आरोग्य कर्मचारी, राज्य राखीव दलातील एक जवान व पेवा (ता.मंठा) येथील एका महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोरोना बधितांमध्ये शुक्रवारी नव्याने सात रुग्णांची भर पडल्याने एकूण बधितांचा आकडा ५१ झाला आहे. गुरुवारी तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आता रुग्णालयात ४१ रुग्ण उपचारखाली आहे. नव्याने आढळलेल्या सात रुग्णामध्ये शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील एक नर्स असून या हॉस्पिटलमधील दोन डॉक्टर आणि सहा कर्मचारी यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

उर्वरित सहा मध्ये शहरातील दुसऱ्या एका नामांकीत हॉस्पिटलमधील चार कर्मचारी, मंठा तालुक्यातील पेवा येथे बाधित आढळून आलेल्या महिलेच्या संपर्कातील एका महिला राज्य राखीव दलातील एका जवानाचा समावेश आहे. बाधित जवान मालेगाव बंदोबस्तावरून परतला होता. भोकरदन येथील कोविड केअर सेंटरमध्ये त्याचे अलगिकरण करण्यात आले होते. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबादेत@१२१२ पॉझिटिव्ह
औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच असताना शुक्रवारी (ता.२२) रोजच्या दिलासादायक म्हणजे सरासरीपेक्षा आज बाधितांची संख्या थोडी कमी आली आहे. आज २६ रुग्ण बाधित झाले असून एकूण रुग्णसंख्या १ हजार २१२ झाली आहे. अशी माहिती घाटी रुग्णालयाने दिली आहे.

आकडे बोलतात...
एकूण रुग्ण - १२१२
मृत्यू -४२
उपचार - ६५८
बरे झालेले - ५१२

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty One CoronaVirus Positive Patient Jalna News