कोरोनाशी लढा: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

doctor.
doctor.

सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनेबद्दल उत्तम कामगिरीची दखल घेत उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी आरोग्य यंत्रणेच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पत्राद्वारे अभिनंदन करण्यात आले आहे.

सेनगाव तालुक्‍यात १३३ गावांचा समावेश आहे. ग्रामीण भागात मजूर, कामगार मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी इतरत्र शहरात स्थलांतरीत होतात. करोना विषाणुजन्य आजाराचा फैलाव होत असताना स्थलांतरीत झालेले नागरिक आपल्या गावाकडे दाखल झाले आहेत.

कौतुकास्पद व उत्तम कामगिरी

 काही मजूर मोठ्या शहरात अडकले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना त्याच्या अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, आशा वर्कर्स, रुग्णवाहिका व्यवस्था यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कौतुकास्पद व उत्तम कामगिरी बजावली आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले कौतुक

 नियोजनबद्ध उपक्रम राबविल्यामुळे आजपर्यंत विषाणूचा प्रादुर्भाव विभागांतर्गत होण्यास प्रतिबंध करणे शक्य झाले आहे. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेत उपविभागीय अधिकारी अतुल वाघमारे यांनी आरोग्य यंत्रणेच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. 

यंत्रणा प्रारंभीपासूनच सतर्क

त्याबाबत अभिनंदन पत्र पाठविले आहे. यापुढेही यशस्वीरीत्या कामगिरी कराल ही अपेक्षा व्यक्त केली आहे. तालुक्यात कोरोना आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा प्रारंभीपासूनच सतर्क राहिली आहे. बाहेर गावातून येणाऱ्या नागरिकांची दररोज नोंदी अशा वर्करमार्फत घेण्यात येत आहेत. 

कोरोनामुक्त राहण्यास मदत 

आजाराचे काही लक्षणे आढळून येताच तत्काळ संबंधित नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली. आरोग्य यंत्रणेसोबत पोलिस, महसूल प्रशासनाकडून चोख जबाबदारी पार पाडण्यात आल्यामुळे तालुका कोरोनामुक्त राहण्यास मदत झाली आहे.

कर्मचाऱ्यांत नवचैतन्य 

उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी आरोग्य विभागाने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यांनी दिलेल्या अभिनंदनाची पाठीवरील थाप आमच्यासाठी नवचैतन्य निर्माण करणारी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होणे हे निश्चित आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची बाब आहे.
- डॉ. सतीश रुणवाल, तालुका आरोग्य अधिकारी


नरसी येथे सॅनिटायझरचे वाटप

हिंगोली : नरसी नामदेव येथे नुकतेच ग्रामविकास अधिकारी चेतन खैरनार यांनी सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी यांच्या मदतीने गावातील सर्व कुटुंबांना घरपोच सॅनिटायझरचे वाटप केले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, सरपंच श्रीमती सोळंके, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, मदतनीस यांची उपस्थिती होती.


 

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com