esakal | व्हिडिओ: संत नामदेव महाराज मंदिरात घुमतोय हरिनामाचा गजर 
sakal

बोलून बातमी शोधा

sant namdev mandir

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत नामदेव महाराज मंदिर बंद असल्याने सर्वच धार्मिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. केवळ पुजारी सकाळ व सायंकाळी अशी दोन वेळेस येथे पूजा-अर्चा करतो. कारोनाचा आजार दूर व्हावा,  देशावर आलेले संकट दूर व्हावे, असे साकडे पुजेतून संत नामदेव महाराजांना घालत असल्याचे मंदिराचे पुजारी अरुण मुळे यांनी सांगितले. 

व्हिडिओ: संत नामदेव महाराज मंदिरात घुमतोय हरिनामाचा गजर 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे संत नामदेव महाराज यांचे जन्मस्‍थान असलेल्या नरसी येथील संत नामदेव महाराज मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांच्या उपस्‍थितीत होणारी आरती, पूजा आता आता पुजारी करीत आहेत. लॉकडाउनच्या काळातही मंदिरातील पूजेत खंड पडू देण्यात आला नाही.

नरसी नामदेव (ता.हिंगोली) येथील संत नामदेव महाराजाचे मंदिर भाविकांच्या गर्दीने फुललेले असते. येथे नियमित धार्मिक कार्यक्रम वर्षभर चालतात. एकादशीला होणारे कीर्तन, भजन, पंगती यातून भाविकांची वर्दळ कायम असते. 

हेही वाचाव्हिडिओ: आनंदाची बातमी: हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त

मिठाची यात्रा प्रसिद्ध

पाडव्यापासून भरणारी संत नामदेव महाराजाची मिठाची यात्रेस राज्यासह परराज्यात देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे राज्यभरातील मिठाचे व्यापारी येथे मीठ विक्रीसाठी घेवून येतात.  संत नामदेव महाराजाच्या दर्शनासाठी पंजाब राज्यातून येणाऱ्या भाविकांची दररोज रिघ लागते. 

कोरोनामुळे यात्रा महोत्‍सव रद्द 

येथे दर्शन घेतल्यानंतर पंजाबमधील भाविक नांदेड येथील गुरुगोविंदसिंगजी महाराज यांच्या गुरूद्वारास भेट देण्यासाठी जातात. मात्र या वर्षी कोरोनामुळे यात्रा महोत्‍सव रद्द करण्यात आला आहे. सध्या हे मंदिर बंद असल्याने सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहेत.

कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी साकडे

 केवळ एक पुजारी नियमित पूजा-अर्चा करीत आहे. सकाळ व सायंकाळी अशी दोन वेळेस येथे पूजा-अर्चा चालते. कारोनाचा आजार दूर व्हावा,  देशावर आलेले संकट दूर व्हावे, असे साकडे पुजेतून संत नामदेव महाराजांना घालत असल्याचे मंदिराचे पुजारी अरुण मुळे यांनी सांगितले. 

सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

दरम्यान, मंदिराचा नुकताच जिर्णोद्धार करण्यात आला आहे. पूर्वीचे मंदिर पाडून मंदिराचे नव्याने संगमवारी दगडातुन काम करण्यात आले आहे. भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. संत नामदेव महाराज यांचे कार्य भारतभर पोचले आहे. 

येथे क्लिक करा...तर भारतही लवकरच कोरोनामुक्त होईल ! कोण म्हणाले वाचा

भाविकही वर्षभर वर्दळ

त्यामुळे भाविकही वर्षभर येथे येतात. भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. निधीस मान्यता मिळाल्याचे सांगितले जात आहे. यानिधीतून येथे भाविकांना चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. 


नियमित पूजा, आरती चालते

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संत नामदेव महाराज मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. येथे केवळ सकाळ व सायंकाळी एकमेव पुजारी येतात.  पूजा, आरती करतात. त्यानंतर मंदिर बंद करून घरी जातात. नेहमी भाविकांच्या गर्दीने फुललेले मंदिर आता बंद आहे. 
-शाहूराव देशमुख, विश्वस्‍त, संत नामदेव महाराज मंदिर