जमावबंदीचे उल्लंघन; धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा, भाजपची एसपीकडे मागणी.   

दत्ता देशमुख
Tuesday, 24 November 2020

भाजपच्या वतीने पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्री मुंडे यांनी दीपावलीच्या काळात जमावबंदी कायद्याचे पालन केले नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. 

बीड : सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कायदा पायदळी तुडवत दीपावली फराळ व स्नेह मिलनाचा कार्यक्रम गर्दीने साजरा केला. कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षित सामाजिक अंतराचे संकेत डावलून जमावबंदी कलमाचे उल्लंघन केले. त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी भाजपने सोमवारी (ता. २३) केली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांना याबाबत निवेदन देण्यात आले. दसरा मेळाव्यातील भक्तांच्या समूहाकडे वक्रदृष्टी करून पोलिसांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा नोंद करून चोख कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. पोलिसांचे पक्षपाती धोरण जनतेसमोर आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी राजेंद्र मस्के, राजेंद्र बांगर, अशोक लोढा, भगीरथ बियाणी, डॉ. लक्ष्मण जाधव, चंद्रकांत फड, शांतीनाथ डोरले, अनिल चांदणे, बालाजी पवार, फारूख शेख, संभाजी सुर्वे,पंकज धांडे, संगीता धसे, संजीवनी राऊत, लता राऊत आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: File case against Dhananjay Munde for violating curfew BJP demand to SP