ऐतिहासिक किल्ल्यातील तटबंदीत माती भरईस दुर्गप्रेमींचा विरोध!  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

शहरातील ऐतिहासिक किल्ल्यात तटबंदी ढासळल्याने दुर्गप्रेमी यांच्या रेट्यामुळे पुर्नबांधकाम चालु आहे. या तटबंदीचे काम चुना वापरुन चांगल्या पद्धतीने सुरु आहे. परंतू या कामात सात फुटाच्या बाजुच्या भरावात माती, बारीक चुरा व‌ बारीक दगड टाकुन भरई केली जात आहे. या कामात माती वापरण्यास जागरुक नागरीक व दुर्गप्रेमीनी विरोध केला.

किल्लेधारुर (बीड) : शहरातील ऐतिहासिक किल्ल्यात तटबंदी ढासळल्याने दुर्गप्रेमी यांच्या रेट्यामुळे पुर्नबांधकाम चालु आहे. या तटबंदीचे काम चुना वापरुन चांगल्या पद्धतीने सुरु आहे. परंतू या कामात सात फुटाच्या बाजुच्या भरावात माती, बारीक चुरा व‌ बारीक दगड टाकुन भरई केली जात आहे. या कामात माती वापरण्यास जागरुक नागरीक व दुर्गप्रेमीनी विरोध केला.

 शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ‘आरटीओ’चे भूत, ओव्हरलोडिंगच्या नावाखाली लूट

 

पुरातत्व विभागाचे खाजगी वास्तुविशारद प्रदीप देशपांडे यांनी दोन दिवसात प्रत्यक्ष भेट देवुन संबधितांना मातीचा वापर करु नये अशा सुचना देण्यात मान्य केले. किल्ल्यातील तटबंदीच्या आतील बाजूस माती टाकण्याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक अभियंता नितीन चारुडे यांनी हे काम वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सुरु ठेवण्यात येईल असे सांगीतले.

बिबट्या सापडेना, शोधमोहीम गुंडाळण्याची तयारी; पंधरा दिवसांच्या मोहिमेत हाती काहीच नाही

 

किल्ल्यातील ढासळलेल्या तटबंदीचे पुर्नबांधकाम आता तरी बोगस होऊ नये या उद्देशाने जागरूक नागरीक व दुर्गप्रेमीनी काम दर्जेदार करण्यासंदर्भात वेळोवेळी भेटी देण्यासोबतच सर्वांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. किल्ल्यातील तटबंदी मोहिमेत सहभागी झालेले पत्रकार प्रकाश काळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव देशमुख, पत्रकार संदिपान तोंडे, युथ क्लब अध्यक्ष सुरेश शिनगारे, अशोक लोकरे, गौतम शेंडगे, प्रदिप जामकर, जलदुत विजय शिनगारे, पुरातत्व विभागाचे समन्वयक नितीन चारुडे व कपिल समर्थ उपस्थित होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(संपादन-गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fill embankment historic fort but Opposition fort lovers