कष्टाने उभ्या केलेला संसार उद्ध्वस्त, आगीमुळे सर्वच जळून खाक

शिवानंद डहाळे यांची अत्यंत प्रतिकुल परिस्थिती आहे. टेलरिंगचा व्यवसाय करत त्यांनी घरामध्ये संसारोपयोगी साहित्याची जमवा-जमव केली होती.
Majalgaon Fire Accident News
Majalgaon Fire Accident Newsesakal

माजलगाव (जि.बीड) : शहरातील नवनाथ नगर भागामध्ये आज बुधवारी (ता.२०) दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान शिवानंद मनोहर डहाळे यांच्या घरामध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शेजारील दिनकर विश्वनाथ जोगडे यांच्या घरातीलही साहित्याचे नुकसान झाले आहे. शहरातील नवनाथ नगर भागामध्ये शिवानंद डहाळे यांचे घर आहे. डहाळे यांचा टेलरिंगचा व्यवसाय असून आज दुपारी कुलर दुरूस्ती करत असतांना झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग (Fire) लागली व घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. (Fire Broke Out In House In Majalgaon Of Beed)

Majalgaon Fire Accident News
Aurangabad : अश्लील व्हिडिओ प्रकरणी अखेर 'किर्तनकार बाबा' ला अटक

डहाळे यांच्या घरातील फ्रिज, कॉट, फॅन, टीव्ही, डिश यासह संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेजारील असलेल्या दिनकर जोगडे यांच्या घरातील एका रूममध्ये देखील आग लागल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी माजलगाव (Majalgaon) नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने पुढाकार घेतला तर आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मिळेल त्याने पाणी टाकत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे.

Majalgaon Fire Accident News
भारतात खूप काही महागाई नाही - निर्मला सीतारमन

संसार आला उघड्यावर......

नवनाथ नगर भागातील शिवानंद डहाळे यांची अत्यंत प्रतिकुल परिस्थिती आहे. टेलरिंगचा व्यवसाय करत त्यांनी घरामध्ये संसारोपयोगी साहित्याची जमवा-जमव केली होती. परंतु लागलेल्या आगीमध्ये डोळ्यांदेखत घरातील साहित्य बेचिराख झाल्याने संसार उघड्यावर आला आहे. शासनाने तात्काळ मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com