‘या’ जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्याविना ध्वजवंदन

राजेश दारव्हेकर
Friday, 1 May 2020

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यालय वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी ध्वजवंदन करू नये असा आदेश काढला होता.  त्यामुळे केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनाचा वर्धापन दिन अगदी साध्या पद्धतीने इतिहासात पहिल्यांदाच साजरा करण्यात आला.

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाभरात  दीड महिन्यापासून लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. त्याचा फटका जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनाही बसला असून, शुक्रवारी महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदनास त्यांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे हिंगोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्याच्या गैरहजेरीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ध्वजवंदन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. एक मे २०२०) महाराष्ट्र राज्याचा ६० वा वर्धापनदिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. पालकमंत्री वर्षा गायकवाड लॉकडाउनमुळे येवू न शकल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.  

हेही वाचा - महाराष्ट्राला हादरवणारी हिंगोली ब्रेकिंग : मालेगाव, मुंबईत ड्यूटी केलेल्या २५ जवानांना कोरोना

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, राज्य राखीव बलाचे महासमादेशक मंचक इप्पर, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी   चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर यांची उपस्थिती होती.

देशभरासह राज्यात कोरोना संसर्ग वाढल्याने, त्याला रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी सुरु आहे. त्यातच शुक्रवारी महाराष्ट्र दिन असल्याने दरवर्षी पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन करून जिल्ह्यातील चालू व मंजूर कामाची माहिती दिली जाते.

हे देखील वाचाच - परभणीत २२७ जणांना घराबाहेर पडणे पडले महागात

मात्र यंदा लॉकडाऊनमुळे पालकमंत्री यांना हजर राहता आले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यालय वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी ध्वजवंदन करू नये असा आदेश काढला होता.  त्यामुळे केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनाचा वर्धापन दिन अगदी साध्या पद्धतीने इतिहासात पहिल्यांदाच साजरा करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Time in the History Flag Salute Guardian Minister Hingoli News