esakal | मद्यपी ट्रक चालकाचा निष्काळजीपणा नडला, रिक्षातील बीडचे पाच जण जागीच ठार

बोलून बातमी शोधा

Beed Accident News}

या अपघातात रिक्षातील तबसुम अबजान पठाण, शारो सत्तार पठाण, रिहान अबजान पठाण (वय 13), तमन्ना अबजान पठाण (वय 8) व मदिना अबजल पठाण  अशी मृतांची नावे आहेत. तर रिक्षा चालक सिद्धार्थ शिंदे, जायबाई कदम, मुजीब कुरेशी, अश्विनी गोविंद पोकळे, गोरख खरसाडे अशी जखमींची नावे आहे.

मद्यपी ट्रक चालकाचा निष्काळजीपणा नडला, रिक्षातील बीडचे पाच जण जागीच ठार
sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : एका मद्यपी ट्रक चालकाने निष्काळजीपणाने ट्रक चालवत प्रवाशी रिक्षा व दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातामध्ये रिक्षातील पाच जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ठार झालेले सर्वजण बीड शहरातील रहिवाशी आहेत.


पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, वडवणी येथून बीडकडे रिक्षा प्रवाशी घेऊन येत होता. यावेळी बीडकडून वडवणीकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच ०९ सीव्ही ९६४४) पांगरबावडी येथे रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षातील तबसुम अबजान पठाण, शारो सत्तार पठाण, रिहान अबजान पठाण (वय 13), तमन्ना अबजान पठाण (वय 8) व मदिना अबजल पठाण  अशी मृतांची नावे आहेत. तर रिक्षा चालक सिद्धार्थ शिंदे, जायबाई कदम, मुजीब कुरेशी, अश्विनी गोविंद पोकळे, गोरख खरसाडे अशी जखमींची नावे आहे.

त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथे एका दुचाकीस धडक दिली. अपघातानंतर रिक्षाचा चुराडा झाला असून रिक्षा खड्ड्यात जाऊन पडला. त्यानंतर ट्रक रस्त्याच्याकडेला खड्डयात जाऊन पलटी झाला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार पवनकुमार राजपुत यांच्यासह आदींनी धाव घेतली आहे . ट्रक चालक फरार झाला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर