Video : लॉकडाऊन : कष्टातून फुलवलेली पाच एकरावरील फुलशेती संकटात

Nanded News
Nanded News

नांदेड : कोरोनामुळे सर्व समाजजिवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठाही थंडावल्या आहेत. परिणामी, वाहतुक व्यवस्था नसल्याने शेतीचा माल बाजारपेठेत ने-आण करणे अवघड झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात आला आहे.

शासनाने जिवनावश्‍यक असणारी सर्व दुकाने उघडी राहतील, असे सांगत असले तरी पोलिस कारवाईच्या धाकाने वाहनचालक मात्र वाहन रस्त्यावर काढत नाहीत. याचा परिणाम शेतातील पिकांची ने-आण करण्यावर होत असून, बहुसंख्य शेतकऱ्यांचा माल अद्यापही घरातच पडून आहे. टोमॅटो, टरबूज, काकडी तसेच हिरवा भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने आमच्या शेतमालाचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे.

शेतकरी कष्टाने शेती पिकवतो. मात्र, त्यांना स्वतः पिकविलेल्या मालाचे दर ठरवता येत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. परिणामी, कवडीमोल भावाने त्यांना व्यापाऱ्यांना हा माल विकावा लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे दुर्लक्ष करून नगदी पिके घेण्याकडे कल वाढवला आहे. नगदी पिक म्हणून शेतकरी आता फुलशेती करण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, गेल्या २० मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात टाळेबंदी जाहीर झाली. त्यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. शेतातच ही फुले कोमेजून जात असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. 

पाच एकरावरील फुले कोमेजली
नांदगाव (ता.लोहा) येथील शेतकरी जगन्नाथ मारोती भरकडे यांनी भाव मिळत नसल्याने पारंपरिकपद्धतीने शेती पिकवणे सोडून दिले आहे. त्यांनी पाच एक्करभर मोगरा, काकडा, कृषीगंध आदींची फुलशेती करायला सुरुवात केली. या फुलांना चांगली बाजारपेठ तसेच दर मिळत असल्याने त्यांचा हा फुलशेतीचा व्यवसाय दिवसागणिक बहरू लागला आहे. मात्र, कोरोनाने कष्टाने फुलविलेल्या फुलशेतीचे मोठे नुकसान झाल्याची खंत त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे. शासनाने फुलशेतीचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी श्री. भरकडे यांनी यावेळी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com