esakal | वनमंडळात सागवान तस्करीने वनसंपदा धोक्यात : कोठे, ते वाचाच

बोलून बातमी शोधा

File photo

भोकर वनमंडळात मोठ्या प्रमाणात सागवान तस्करीने डोके वर काढले आहे. संबंधित अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. नाममात्र कार्यवाही करून मोकळे होत असल्याने फर्निचर व्यापारी मालामाल बनले आहेत.

वनमंडळात सागवान तस्करीने वनसंपदा धोक्यात : कोठे, ते वाचाच
sakal_logo
By
बाबुराव पाटील

भोकर (जि.नांदेड) :  निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे वन विभागाने ‘झाडे लावा-झाडे जगवा’ ही मोहीम राबविली आहे. मात्र,  शहरातील फर्निचर व्यापारी आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यात छुपी मिलिभगत असल्याने वनविभागातील अधिकारी व कर्मचारी फारसे गांभीर्याने लक्ष देत नाही. परिणामी वनमंडळात मोठ्या प्रमाणात सागवान तस्करीने डोके वर काढल्याने समृद्ध असलेली वनसंपदा धोक्यात आली आहे.

यासाठी आखली योजना
निसर्ग आता लहरी बनत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. दिवसेंदिवस ऋतुचक्र दोलायमान होताना दिसत आहे. याचा मोठा फटका जनतेला सहन करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी एकमेव रामबाण उपाय म्हणजे वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे. तरच ढळत चाललेला समतोल कायम राहील, अन्यथा जंगलाचे वाळवंट होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या बाबींचा विचार करून वनविभागाने ‘झाडे लावा-झाडे जगवा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. 

हेही वाचा - वाळू तस्करीच्या वादात तरुण शेतकऱ्याचा खून

कोट्यवधीच्या निधीची उधळण
वनविभागाने वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी तसेच वनसंपदा वाढविण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून वृक्षलागवड हाती घेण्यात आली. यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हेकेकोरवृत्तीमुळे ही योजना केवळ कागदावरच राहिली आहे. परिणामी या महत्त्वपूर्ण योजनेचा बोजवारा उडाला आहे. भोकर वनमंडळात मागील अनेक दिवसांपासून सावळा गोंधळ सुरू आहे. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नष्ठ होणारी वनसंपदा जोपासण्यासाठी उपाययोजना करावी, अशी वनप्रेमींची वाढती मागणी जोर धरू लागली आहे.

हे देखील वाचा - दूर्दैवी घटना...! तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
 
फर्निचर व्यापारी मालामाल 
शहरात मागील अनेक दिवसांपासून फर्निचर दुकानांत विनापरवाना सागवान लाकडांचे साठवण केले जात आहे. नाममात्र अधिकृत परवाना घेतलेले सागवान प्रथमदर्शनी ठेवून दिशाभूल केली जात आहे. भोकर वनमंडळात मोठ्या प्रमाणात सागवान तस्करीने डोके वर काढले आहे. संबंधित अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. नाममात्र कार्यवाही करून मोकळे होत असल्याने फर्निचर व्यापारी मालामाल बनले आहेत.

हे तुम्ही बघाच - Video: अबब...! मोबाईल ‘रेंज’साठी झाडावर स्वारी
 
वनउद्यानाचे काम रखडले 
शहरात वनउद्यान उभारणीसाठी लागणारा निधी प्रारंभी देण्यात आल्याने कामाला सुरवात झाली होती. नागरिकानांही याची उत्सुकता लागून होती. बरीच कामे आजघडीला अर्धवट अवस्थेत पडून आहेत. संबंधित जबाबदार वनकर्मचारी व कंत्राटदार मात्र, बिनधास्त असल्याने वैभवात भर घालणारे काम रखडले आहे. त्वरित काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.