माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचे निधन  

सुभाष बिडे
Monday, 8 June 2020

अंबड विधानसभा मतदार संघातील मूळ रहिवासी असलेले पहिले माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचे सोमवार (ता.आठ ) सकाळी पहाटे पाच वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. 

घनसावंगी : अंबड विधानसभा मतदार संघातील मूळ रहिवासी असलेले पहिले माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचे सोमवार (ता.आठ ) सकाळी पहाटे पाच वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. 

हे ही वाचा : अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक ! 
१९६७ ते १९७२ च्या काळात अंबड विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले होते. त्यांच्या काळात अंबड तालुक्याचे विभाजन करुन नव्याने घनसावंगी तालुका निर्मीतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

या पूर्वी या विधानसभा मतदारसंघातून बाहेरच्या जिल्ह्यातील व तालुक्याबाहेरचे आमदार झाले होते. मात्र, पूर्वीच्या अंबड व आताच्या घनसावंगी तालुक्यातील कंडारी अंबड येथील रहिवासी असलेले अण्णासाहेब उढाण यांना स्वतःच्या तालुक्यात आमदार होण्याचा मान मिळाला.  

हे ही वाचा : सात दिवसांची तान्हुली ममस्पर्शाला मुकली..कोरोनाबाधित बाळंतणीचा घाटीत मृत्यू 

त्यांच्या काळात सिंचन, रस्ते यासह अनेक विकासाकामांच्या योजनेचा पाया रचला गेला. त्यानंतर १९७२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत अंकुशराव टोपे यांच्या विरोधात झालेल्या निवडणुकीचा संघर्ष संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याने पाहिला होता. त्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य,  बांधकाम -आरोग्य सभापती , जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक , अंबड तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशा विविध पदावर त्यांनी काम केले.

हे ही वाचा : सात दिवसांची तान्हुली ममस्पर्शाला मुकली..कोरोनाबाधित बाळंतणीचा घाटीत मृत्यू 

जालना जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष यासह अनेक पदावर त्यांनी काम केले. त्या काळचे काँग्रेसचे नेते  शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी सर्वप्रथम त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतू त्यांचे राजकीय विरोधक असलेले दिवंगत अंकुशराव टोपे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच अण्णासाहेब उढाण हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये पुन्हा  प्रवेश केला.

हे ही वाचा : सात जन्म काय..सात सेंकंद देखील नको बायको आम्हाला |

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंत दादा पाटील , शिवाजीराव निलंगेकर यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख होती. तसेच जालना जिल्ह्यात त्यांचा मोठा दबदबा होता.  त्यांच्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ,  भूविकास बँक , खरेदी विक्री संघ येथे अनेकानी त्यांनी काळात नोकरीस लावले होते.

हे ही वाचा :

बापरे... अचानक का वाढला औरंगाबादेत मृत्यूदर 

संपूर्ण मतदारसंघात दादा म्हणून ते परिचित होते. संपूर्ण राजकीय हयातीत त्यांनी आपल्या स्वपक्षातील नेत्याशी संघर्ष तर कधी विरोध केल्याचे अनेक निवडणूकासह जिल्ह्याच्या राजकारणात दिसून आले. त्यांच्या पश्चात मुलगा निळकंठ उढाण व पाच मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कंडारी अंबड ( ता. घनसावंगी) येथे सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Annasaheb Udhan passes away