esakal | चाकुरात माजी नगराध्यक्षांचा आत्मदहनाचा प्रयत्न | Latur News
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News
चाकुरात माजी नगराध्यक्षांचा आत्मदहनाचा प्रयत्न

चाकुरात माजी नगराध्यक्षांचा आत्मदहनाचा प्रयत्न

sakal_logo
By
प्रशांत शेटे

चाकूर (जि.लातूर) : अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शासनाने तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी शुक्रवारी (ता.आठ) दुपारी येथील जुन्या बसस्थानकासमोर (Chakur) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain In Marathwada) हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने यांना आर्थिक मदत देण्याऐवजी पंचनाम्याच्या नावावर वेळ काढूपणा केला जात आहे. दसरा व दिवाळी हे सण येत असल्यामुळे शेतकरी व शेतमजूरांना तात्काळ (Latur) मदत करावी अन्यथा ८ ऑक्टोबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला होता.

हेही वाचा: भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यावर गुन्हा दाखल

याबाबत तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे यांनी आत्मदहन करू नये असे पत्र दिले होते. तरीही माजी नगराध्यक्ष श्री. महालिंगे हे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस निरीक्षक बालाजी मोहीते, पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने, पोलीस हवालदार हणमंत आरदवाड, प्रशांत भंडे, सुग्रीव मुंडे, मारोती तुडमे, याकुब शेख, गिरीराज सुर्यवंशी यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या आंदोलनात सुग्रीव महालिंगे, लक्ष्मण तिकटे, चेतन महालिंगे, शरीफ मासुलदार, बालाजी मोठेराव, ज्ञानोबा महालिंगे, नागसेन महालिंगे, शुभम महालिंगे आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा: पालकाशी अश्लील भाषा बोलणाऱ्या मुख्याध्यापकाचे तडकाफडकी निलंबन

loading image
go to top