परभणीत चार मृत्यू, ७५ पॉझिटिव्ह

गणेश पांडे 
Thursday, 1 October 2020

परभणी जिल्ह्यात गुरुवारी (ता.एक) चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर नव्याने ७५ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. मृतामंध्ये शासकीय रुग्णालयातील एक महिला, एक पुरुष आणि खासगी रुग्णालयातील एक महिला, एका पुरुषाचा समावेश आहे.

परभणीः जिल्ह्यात गुरुवारी (ता.एक) चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर नव्याने ७५ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. मृतामंध्ये शासकीय रुग्णालयातील एक महिला, एक पुरुष आणि खासगी रुग्णालयातील एक महिला, एका पुरुषाचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण पाच हजार ४६९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी चार हजार ६५९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ५७९ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि २३१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला. दररोज ५० ते शंभर पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होत आहे.

हेही वाचा -  दिवाळीनंतर डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भिती

परभणीत पाचजण पॉझिटिव्ह 
परभणी ः शहर महापालिकेच्या वतीने गुरुवारी(ता.एक) शहरातील पाच केंद्रांत ६६ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात ६१ निगेटिव्ह तर पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या.सीटी क्लब येथे २३ व्यक्तींची तपासणी केली असता एकजण पॉझिटिव्ह आढळला. साखला प्लॉट आरोग्य केंद्रात एक जणांची तपासणी करण्यात आली. खंडोबा बाजार आरोग्य केंद्रात पाच, जायकवाडी मनपा रुग्णालयात १८ जणांची तपासणी करण्यात आली. तेथे दोनजण पॉझिटिव्ह आढळले. खानापूर आरोग्य केंद्रात आठजणांची तपासणी केली. तेथे एकजण पॉझिटिव्ह सापडला. खासगी रुग्णालयात ११ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात एकजण पॉझिटिव्ह सापडला असल्याची माहिती नोडल अधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी दिली. मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. 

हेही वाचा - महसूल कर्मचाऱ्यांच्या संपात ५८३ अधिकारी कर्मचारी सहभागी 

हिंगोलीत १८ पॉझिटिव्ह
हिंगोली ः जिल्ह्यात गुरुवारी (ता.एक) नव्याने १८ रुग्ण आढळले तर २१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. यापैकी १५ रुग्ण रॅपिड अँन्टीजन टेस्टद्वारे तर तीन रुग्ण आरटीपीसीआर टेस्टमध्ये आढळले. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण दोन हजार ६९७ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी दोन हजार ३४१ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ३१९ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ३७ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला.

गुरुवारी (ता.एक) रात्री आठ वाजेपर्यंतची आकडेवारी

परभणी जिल्हा 
एकूण बाधित - पाच हजार ४६९
आजचे बाधित - ७५
आजचे मृत्यु - चार
एकूण बरे - चार हजार ६५९
उपचार सुरु असलेले - ५७९
एकूण मृत्यु - २३१

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four deaths in Parbhani, 75 positive, Parbhani News