कर्ज देण्याची थाप मारून फसवणूक, परंडा ठाण्यात गुन्हा दाखल!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

अनोळखी व्यक्तीविरुद्ध परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा 

उस्मानाबाद : कर्ज मिळवून देण्यासाठी बँकेतून बोलत असल्याचा बहाणा करून एका व्यक्तीची ६६ हजार ६५० रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सुधीर ऋषिनाथ पाटील (रा. आरणगाव, ता. परंडा) यांना १५ ऑक्टोबरला एका अनोळखी व्यक्तीने कॉल करून आपण एका फायनान्स कंपनीतून बोलत असल्याची थाप मारली. शिवाय कर्ज पाहिजे असेल तर बॅंक पासबूक, आधार-पॅनकार्डच्या फोटोकॉपी व्हॉट्सअॅपवर पाठवा, असे सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

श्री. पाटील यांनी संबंधित व्यक्तीवर विश्वास ठेवून कागदपत्रे पाठविली. काही दिवसांनी त्या व्यक्तीने पाटील यांना कर्ज मंजुरीचा मेसेज पाठवला. त्यात करारनाम्यासाठी पाच हजार रुपये खर्च येईल असे सांगून एक बँक खाते क्रमांक देऊन त्यात ती रक्कम भरण्यास सांगितले. श्री. पाटील यांनी रक्कम भरल्यानंतर आरोपीने मेसेस, कॉल करून कर्ज मंजुरीच्या वेगवेगळ्या बहाण्याने पैसे मागितले. श्री. पाटील यांनी वेळोवेळी एकूण ६६ हजार ६५० रुपये रक्कम ऑनलाइन व प्रत्यक्ष बँकेत जाऊन त्याने सांगितलेल्या खात्यात भरले. यानंतर त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीने कर्जही मिळवून दिले नाही आणि कर्ज मंजुरीपोटी घेतलेली नमूद रक्कमही परत केली नाही. या प्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud by giving loan crime filed Paranda police station