रिलायन्स मॉलला सहा लाखांचा चुना 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

राठोड दररोज आर्थिक व्यवहाराचे कामकाज पाहत होता. मॉलमधील सर्व काउन्टरवर दिवसभरात जमा झालेले पैसे राठोड जमा करून सीएएमएस एजन्सीकडे सुपूर्द करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती.

औरंगाबाद : गारखेड्यातील रिलायन्स मॉलमध्ये दररोज जमा होणारी रक्कम तपासून बॅंकेत जमा करण्याऐवजी त्या रकमेचा अपहार करून मॉलला सहा लाखांचा चुना लावल्याप्रकरणात आरोपी कॅशिअरला सोमवारी (ता.नऊ) सायंकाळी पोलिसांनी अटक केली.

त्याला शनिवारपर्यंत (ता.14) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सुंगारे-तांबडे यांनी मंगळवारी (ता.10) दिले. महादेव राठोड (वय 26, रा. गिरधरवाडी ता. पालम जि. परभणी, ह.मु. आकाशवाणी) असे त्या आरोपीचे नाव आहे. 

बोहनी हो गई क्या, म्हणत पाच हजारांचा दंड

रिलायन्स मॉलचे व्यवस्थापक प्रेमकुमार गुप्ता यांच्या तक्रारीनुसार, राठोडची नाशिक शाखेतून औरंगाबाद येथे मार्च 2019 मध्ये बदली करण्यात आली होती. राठोड दररोज आर्थिक व्यवहाराचे कामकाज पाहत होता. मॉलमधील सर्व काउन्टरवर दिवसभरात जमा झालेले पैसे राठोड जमा करून सीएएमएस एजन्सीकडे सुपूर्द करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती.

काय असते फाशीची पूर्वतयारी?

मात्र, एक ते तीन डिसेंबरदरम्यान त्याने दररोजच्या रकमेतून काही रक्कम काढून तीन दिवसांमध्ये एकूण सहा लाख तीन हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर तो रजेवर गेला. तत्पूर्वी त्याने तिजोरीची चावीदेखील स्वत:कडे ठेऊन घेतली. हा प्रकार समोर आल्यावर गुप्ता यांनी त्याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने ही रक्कम खर्च केल्याचे सांगितले. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कसा तयार होतो फाशीचा दोर?
 
दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक सरकारी वकील एस.एल. दास (जोशी) यांनी आरोपीकडून अपहार केलेली रक्कम कोणाकडे ठेवली आहे का? किंवा रकमेची विल्हेवाट कशी लावली, याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud in Reliance Mall Aurangabad, Cashier Arrested