Phulambri News : केदारनाथ धामातही फुलंब्रीच्या राजकारणाची चर्चा..! 'फिक्स आमदार'च्या फलकाने वेधले भाविकांचे लक्ष, सुहास शिरसाठांच्या विजयासाठी महादेवाला साकडे

उत्तराखंडमधील पवित्र केदारनाथ धाम येथे दर्शनासाठी गेलेल्या फुलंब्री शहरातील तरुणांनी भाजपाचे विधान परिषद उमेदवार सुहास शिरसाठ यांच्या समर्थनार्थ फलक झळकावत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
kedarnath suhas shirsath banner

kedarnath suhas shirsath banner

sakal

Updated on

फुलंब्री - उत्तराखंडमधील पवित्र केदारनाथ धाम येथे दर्शनासाठी गेलेल्या फुलंब्री शहरातील तरुणांनी भाजपाचे विधान परिषद उमेदवार सुहास शिरसाठ यांच्या समर्थनार्थ फलक झळकावत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. मंदिरासमोर फुलंब्री शहरातील मनोज गायके, अनिल देवकर, गिरजाराम महाजन, चंदू बोरसे,रुपेश जैस्वाल,अजय निंभोरे यांनी स्वतः हातात "फिक्स आमदार" असा उल्लेख असलेला फलक प्रदर्शित करण्यात आल्याने केदारनाथ धामातही फुलंब्रीच्या राजकारणाची चर्चा रंगली. त्यांना राम बनसोड व भगवान निराशे यांचे सहकार्य लाभले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com