दहा हजार कोटींची कामे रद्द करून कोरोना उपाययोजनेला निधी द्या -विनायक मेटे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

मार्च महिन्यात विविध विकासकामांसाठी वाटप केलेला दहा हजार कोटी रुपयांचा निधी रद्द करून तो कोरोना उपाययोजनांसाठी द्यावा, अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली. 

बीड - एकीकडे अत्यावश्यक सेवेतील पोलिस, नर्स, डॉक्टर अशा शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन कपात केले जाते. कोरोना उपाययोजनेसाठी ते आवश्यकही आहे. मग, मार्च महिन्यात विविध विकासकामांसाठी वाटप केलेला दहा हजार कोटी रुपयांचा निधी रद्द करून तो कोरोना उपाययोजनांसाठी द्यावा, अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली. 

कोरोना व लॉकडाउनमुळे यावर्षी राज्याचा महसूल किमान ४० हजार कोटी रुपयांनी कमी होणार असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 
शासनाच्या ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय, आदिवासी विकास अशा विविध विभागांनी १५ ते ३१ मार्चच्या काळात साधारण आठ ते दहा हजार कोटी रुपयांची विकासकामे हाती घेतली आहेत. या सर्व निधीमधील अत्यंत महत्त्वाची कामे फक्त १० ते १५ टक्केच असू शकतील. बाकी सर्व कामे एक वर्षाच्या नंतर केली तरीही काहीही अडचण येऊ शकणार नाही, असेही श्री. मेटे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

शासकीय कर्मचारी-अधिकारी यांचे पगार कपात किंवा दोन टप्प्यांमध्ये देत असल्याचा उल्लेख करीत राज्याची आर्थिक स्थिती पाहून हे योग्यही असू शकेल; पण दुसऱ्या बाजूला मात्र वेगवेगळ्या विभागांना मात्र हजारो आणि शेकडो कोटींचा निधी वितरित करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आवश्यक नसणाऱ्या कामांस स्थगिती देऊन त्याचा निधी राज्य शासन हे कोरोना महामारीचा सामना राज्य शासन करीत आहे त्यासाठी हा निधी वळविण्यात यावा, लोकप्रतिनिधींसाठी दिलेला निधी थांबविण्याची मागणीही केली आहे. पत्रासह त्यांनी व्हिडिओद्वारे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली आहे. 
 

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fund the Corona Remedy Scheme by canceling works worth Rs 10,000 crore