चोरीचे सोने खरेदीप्रकरणी  गंगाखेडच्या सराफ्याला घेतले ताब्यात !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

सोलापुर जिल्ह्यातील वैराग पोलिस ठाण्यात रुई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेच्या घरी ता.१६ ते ता.१७ नोव्हेंबर या कालावधीत चोरी झाली होती. या चोरीतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरीचा तपास करण्यासाठी गुरुवारी गंगाखेड येथील सराफा व्यापाऱ्याला ताब्यात घेतले.
 

गंगाखेड : गंगाखेड  शहरातील भगवती चौकात असलेला सराफा दुकानदार रवींद्र उडानशिव याला गुरुवारी (ता.१२) चोरीचे सोने, चांदी खरेदी केल्याप्रकरणी सोलापुर जिल्ह्यातील वैराग पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. गंगाखेड पोलिस ठाण्यात आणून चौकशी दरम्यान, सदरील चोरीचा माल हस्तगत केला. या कार्यवाहीमुळे सराफा बाजारात चर्चेला उधाण आले आहे.

सोलापुर जिल्ह्यातील वैराग पोलिस ठाण्यात रुई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा विजय विष्णू या दिवाळीसाठी आपल्या माहेरी बार्शी येथे गेल्या होत्या. ता.१६ ते ता.१७ नोव्हेंबर या कालावधीत त्यांच्या घरी चोरी झाली होती.  परिचारीका वर्षा विष्णु या बार्शी तालुक्यातील रूई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय निवासस्थानी राहत होत्या. 
या निवासस्थानाचे कुलुप तोडून त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने, एल. ई. डी. संगणक पी. सी. वो., डीजीटल ग्लुकोमीटर, असा ऐवज लंपास केला होता. ज्याची किंमत एक लाख तीस हजार सातशे रुपये होती. या गुन्ह्याची नोंद वैराग पोलिस ठाण्यात होती.

असे आहे परभणी जिल्ह्यातील पंचायत समितीचे आरक्षण

१३ चोरट्याना अटक

या चोरीचा तपास वैराग पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी लावला. या चोरी प्रकरणात १३ चोरट्याना अटक केली. दरम्यान, चोरट्यानी चोरीचे सोने व चांदी गंगाखेड येथील सराफा व्यापाऱ्यास विकल्याचे सांगितले. या चोरीच्या सोन्या चादीचे दागिने खरेदी प्रकरणी वैराग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र राठोड, पो. ना. हेंबाडे., पो. ना. शिवाजी मुंडे., पो. ना. सचीन मुंडे यांनी चोरीच्या प्रकरणातील विक्री केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू  कोणी खरेदी केल्या हे दाखवण्यासाठी आरोपी लक्ष्मी शहानुर शिंदे, ताई राजेंद्र शिदे (रा. हिंगणी ता. बार्शी, जिल्हा सोलापुर) यांना घेऊन गंगाखेड येथे दाखल झाले. 

‘येथील’ सोनसाखळी चोरांना ‘अच्छे’ दिन ​

चोरीचा ऐवज हस्तगत केला

गंगाखेड पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी घेऊन वैराग पोलिसाचे पथक रविंद्र उडाशिव यांच्या सराफा दुकानवर जाऊन त्याला ताब्यात घेतले. गंगाखेड पोलिस ठाण्यात व्यापाऱ्याची चौकशी केली. सराफा व्यापारी रविंद्र उडाशिव यांची चौकशी केली असता त्याने चोरीचे सोने चांदीची खरेदी केलेल्या वस्तू तीन तोळ्याची सोन्याची लगड, दोन सोन्याच्या अंगठ्या, तीन चांदीच्या वाट्या, दोन चांदीचे फुलपात्र, एक चांदीची लक्ष्मीची मुर्ती, असा ऐवज  हस्तगत केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangakhed reserves taken into custody for buying stolen gold!