esakal | गायत्री परिवारातर्फे दोन हजार डब्यांचे वाटप

बोलून बातमी शोधा

Gayatri family distributes two thousand boxes of food Hingoli news

हिंगोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र सुरू असलेल्या लॉकडाउन व सीमाबंदीमुळे बाहेर राज्यातून आलेले अनेक मजूर शहरात अडकले आहेत. तसेच हातावर पोट असणारांची कामे खोळबंल्याने ते अडचणीत आहेत. जिल्‍हा सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयातील रुग्णांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जेवनाची गैरसोय होऊ नये यासाठी येथील गायत्री परिवारातर्फे दररोज जेवणाचे दोन हजार डबे पुरविले जात आहेत.

गायत्री परिवारातर्फे दोन हजार डब्यांचे वाटप
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र सुरू असलेल्या लॉकडाउन व सीमाबंदीमुळे बाहेर राज्यातून आलेले अनेक मजूर शहरात अडकले आहेत. तसेच हातावर पोट असणारांची कामे खोळबंल्याने ते अडचणीत आहेत. जिल्‍हा सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयातील रुग्णांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जेवनाची गैरसोय होऊ नये यासाठी येथील गायत्री परिवारातर्फे दररोज जेवणाचे दोन हजार डबे पुरविले जात आहेत.

शहरात तेलंगणा, तामिळनाडू, राजस्‍थान येथील ८१४ मजूर तसेच जिल्‍हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयातदेखील विविध आजारांचे उपचार घेत असलेले रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी गायत्री परिवाराने पुढाकार घेतला आहे. मार्च (ता.२२) पासून सकाळ व सायंकाळी अशी दोन वेळेस भोजन पुरविले जात आहे.

हेही वाचाहिंगोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

६० स्‍वयंसेवकांचे सहकार्य

 गरजूंना जेवनाचे डब्बे मिळत असल्याने त्यांच्या जेवनाची चिंता मिटण्यास मदत झाली आहे. शहरातील दानशुरांच्या पाठबळावर अन्नदानाचा उपक्रम सुरू आहे. यासाठी गायत्री परिवाराचे ६० स्‍वयंसेवक सहकार्य करीत आहेत. पाच हजार गरजूंपर्यंत जेवणाचे डबे पोचविण्याची व्यवस्‍था करण्याचा संकल्‍प गायत्री परिवाराने केला असल्याचे गायत्री प्रमुख रामचंद्र कयाल यांनी सांगितले. या उपक्रमाचे व दानशुरांच्या सहकार्याचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे.  


कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्‍था

सेनगाव : कारोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या संचारबंदीच्या कामी कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्‍था शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. शहरात संचारबदीच्या काळात बंदोबस्तात अनेक पोलिस कर्मचारी आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांना बाहेर गावावरून देखील येथे यावे लागत आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी तहसीलदार जीवककुमार कांबळे, मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी आवाहन केले होते.

येथे क्लिक करादिल्लीतील कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जणांचा समावेश
 
संदेश देशमुख यांचा पुढाकार

 त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्‍यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे सहकारी, व्यापारी, शिक्षक मित्रांच्या सहकार्याने दररोज ४० ते ४५ पोलिस कर्माचाऱ्यांना जेवणाचे डबे पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवण तयार करण्याची जाबाबदारी दत्त भोजनालयास दिली आहे. 

पदाधिकाऱ्यांचा समावेश

यासाठी युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण महाजन, अनिल अगस्ती, शिरीष तोष्णीवाल, शैलेश तोष्णीवाल, प्रवीण महाजन, निखील देशमुख, सुदाम मुंढे, दत्त भोजनालयाच्या श्रीमती पवार, राम देशमुख, मारोती वऱ्हाडे, वैभव देशमुख, हेमंत संघई, राम लोया, जैन समाज बांधव, सुनील पोले, संकेत पठाडे, कैलास साबू, जीवन काबरा, मनोज मुंदडा, संजय शिंदे पुढाकार घेत आहेत.